🌏 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐
🌹परीपाठ*🌹
❂ दिनांक:~ 08/ 12/2018
🔘 *वार :- शनिवार---🔘
➿➿➿➿➿➿➿➿
*संकलन* (एकुन मुद्दे 1 ते17)
⛔⛔⛔⛔⛔⛔
🌅 * बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔ 9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
सौजन्य - नितीन केवटे, समूह प्रमुख
भालचंद्र भोळे, मुख्य प्रशासक
..•●◆●★TSS★●◆●•═━━
अधिक अपडेट साठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या
http://tssmaha.blogspot.com/?m=1
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*💥🇮🇳 *राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*01 ] 🔊 आजचे पंजाग 📢
📱📱📱📱📱📱📱📱📱
विद्यार्थी दिन (स्टुदेन्स्की प्राझ्निक) : बल्गेरिया.
मातृ दिन : पनामा.
संविधान दिन : रोमेनिया.
जागतिक मतिमंद पुनर्वसन दिन
महिना : मार्गशीर्ष, तिथी : शु.प्रतिपदा , नक्षत्र : मूळ
योग : शूल, करण : बालव
सूर्योदय: ७.०२ सूर्यास्त: १७.५९
देवदीपावली
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*0२ ] सुविचार
💒💒💒💒💒💒💒💒
जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
📖📖📖📖🎟🎟🎟🎟
३) म्हण व त्याचा अर्थ
🎄🎄🎄🎄🎌🎌🎌🎌
नाव मोठे लक्षण खोटे –
★ अर्थ ::~ कीर्ती मोठी पण कृती छोटी
➖➖➖➖➖➖➖
(4) ❂ प्रार्थना❂
➿➿➿➿➿➿➿🎺गगन, सदन तेजोमय
✶✶✹✹★●★✹✹✶✶
गगन, सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश, देई अभय
छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्यातून, तार्यांतुन
वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण
हे तुझेच रूप सदय
वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय
भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकल-शरण, मनमोहन
सृजन तूच, तूच विलय
➖➖➖➖➖➖➖➖➖
*05 ] 💠💠 सुभाषीत💠💠💠
====••◆◆●★●◆◆◆••====
अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः |
अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते |➖➖➖➖➖➖➖
*06] ♦दिनविशेष*♦
🛡 ★ 08. डिसेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन
★ हा या वर्षातील ३४२ वा दिवस आहे. (लीप वर्षातील ३४३ वा)
★ जपानमध्ये हा दिवस "बोधी दिवस" म्हणून साजरा केला जात
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
●१९७१ : भारत पाक युद्ध – भारतीय आरमाराने पाकिस्तानातील कराची बंदरावर हल्ला केला.
●१९४१ : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलँड, हाँगकाँग, फिलिपाइन्स व डच इस्ट इंडिज वर हल्ला केला. याच्या एकच दिवस आधी जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला चढवला होता.
●१७४० : दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४४ : शर्मिला टागोर – चित्रपट अभिनेत्री
◆१९३५ : धर्मेन्द्र – चित्रपट अभिनेता
◆१९०० : उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२)
◆१८९७ : पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)
◆१८७७ : नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक
◆१७६५ : एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक
१७२१ : बाळाजी बाजीराव तथा ’नानासाहेब पेशवा’ (मृत्यू: २३ जून १७६१)
📖📖📖📖📖📖📖📖📖
7)बोधकथा
🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊
🐿 बेडुक आणि उंदीर🐿
एक उंदीर आणि एक बेडुक एकमेकांचे मित्र होते. बेडूक उंदराच्या घरी जाऊन वारंवार पाहुणचार घेत असे. त्याने उंदरालाही आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. परंतु वाटेत पाणी असल्याने 'मी येऊ शकत नाही,' असे सांगून उंदीर ते टाळीत असे. परंतु एकदा बेडकाने खूपच आग्रह केला व त्याचा एक पाय आपल्या एका पायाला बांधून पाण्यातून निघाले.
वाटेत बेडकाच्या मनात आलं की, उंदराला पाण्यात बुडवून टाकले म्हणजे त्याच्या बिळातले सर्व अन्न आपल्याला मिळू शकेल म्हणून त्याने पाण्याच्या तळाशी बुडी मारली. तेव्हा उंदीर जोरजोरात ओरडून धडपड करू लागला. त्याचा आवाज ऐकून, आकाशातली एक घार खाली आली आणि उंदराला तोंडात धरून उंच उडाली. उंदराच्या पायाला बेडकाचा पाय बांधला असल्यामुळे तोही पकडला गेला. घारीने उंदराबरोबर त्यालाही खाऊन टाकले
*_🌀तात्पर्य_ ::~*
*विश्वासघात करणार्या माणसाला प्रायश्चित्त हे मिळतेच*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
7) समुहगित
🎬🎬🎬🎬🎬🎬🎬
आई तुझ्याच पायी मजला सुखे मरु दे
यश माप हे भरु दे॥धृ॥
कसली विलोभने ही
दिसतील ठायि ठायी
उडवीन ठोकरीने
तव साउली असु दे ॥१॥
तव पुत्र कोटि कोटी
परि भाग्य ना ललाटी
जाणीव जाळिते ही
रजनी तरी जळू दे॥२॥
निज संपदा घराला
येता फिरुन तिजला
पद दोन टाकण्याते
मम देह हा असु दे॥३॥
उधळीन प्राण माझे
चरणास रक्त ताजे
हसरा मुखेंदु आई
मम लोचनी असू दे॥४॥
समरी ध्वजा चढावी
गगनी उषा हसावी
जयनाद होउनीया
श्रवणी तुझ्या पडू दे॥५॥
➖➖➖➖➖➖➖➖◆•◆
9)* *बालगित*
➡➡➡➡➡➡➡➡
या वार्याच्या बसुनी विमानी सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची
आज पौर्णिमा जमले तारे आकाशाच्या वर्गात
चांदोबा गुरुजी तर दिसती कुठल्या मोठ्या मौजात
हसुनी चांदण्या करीती किलबील अपुल्या इवल्या डोळ्यांची
द्वितीयेपासून रोजची येती गुरुजी उशीरा शाळेत
मुले चांदणी फुलती आणिक सगळी अपुल्या गमतीत
कधी वर्गातून पळते उल्का ओढ लागुनी पृथ्वीची
कुणी तेजाचे ओठ हलवूनी मंगळास वेडावित असे
रागाने मग मंगळ वेडा गोरामोरा होत असे
बघुनी सारे हसता हसता उडते चंगळ तार्यांची
कधी वेळेवर केव्हा उशीरा, अवसेला तर पूर्ण रजा
राग कधी ना या गुरुजींना, कधी कुणा करीती ना सजा
असे मिळाया गुरुजी आम्हां करू प्रार्थना देवाची
.🏯🏯🏯🏯🏯🏯🏯🏯🏯
10 ] देशभक्ति गीत
🗑🗑🗑🗑🗑🗑🗑🗑🗑
वन्दे मातरम्।
🎤🎤🎤🎤🎤🎤
सुजलाम् सुफलाम्
मलयजशीतलाम्
शस्यश्यामला मातरम्।
वन्दे मातरम्।
शुभ्रज्योत्स्नाम्
पुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमित
द्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम्
सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम्
मातरम्।।
वन्दे मातरम्।
🎻🎹🎺🎸🎷🎵🎙🎚
===================
11] थोरपुरुष माहिती
Download : https://goo.gl/UVYMCG
पंजाबराव देशमुख
पंजाबराव देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी झाला. उच्च शिक्षण घेऊन स्वातंत्र्याच्या लढ्यात ते सहभागी झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकीच्या नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,००० च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये , अभियांत्रिकी पदवी , तसेच पदविका तंत्रनिकेतन , कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरू करून आज शिक्षण क्षेत्रात फार मोठं योगदान देत आहे.
🎆🎆🎆🎍🎍🎆🎆🎆🎆
14] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
5. *✿संशोधक व लावलेले शोध✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
▪ विमान ➜ राईट बंधू
▪ रेडिओ ➜ जी.मार्कोनी
▪ टेलिव्हिजन ➜ जॉन बेअर्ड
▪ विजेचा दिवा ➜ थाॅमस एडीसन
▪ सेफ्टी लॅम्प ➜ हंप्रे डेव्ही
▪ डायनामो ➜ मायकेल फॅराडे📖📖📖📖📖📖📖
15)आजचे इंग्रजि शब्द
❄❄❄❄❄❄❄
१)Japan:- चकाकणारे काळे जपानी लुकन
२) Losen:- सेल करणे
३)Sotho सोथो
४)Orbit:-भ्रमणकक्षा
५) Checkup
:- पुर्ण वैद्यकिय तपासणी
🌐🌐🌐🌐🌐🌐🌐
१६) आजचा 8 पाढा
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏
8,16,24,32,40,48,56,64,72,
80
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║
शनिवार
🏖🏖🏖🏖🏖🏖
08/12/2018 ◆*
🌐 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐
🌀🎯 धरुनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची 🎯🌀
❄❄❄❄❄❄❄❄
🖕माझ्या blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
समाप्त
➖➖➖➖
No comments:
Post a Comment