🌹परीपाठ*🌹
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
*🌅 * बालचंद चौधरी* *वैजापुर* 9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 26 /11/2018 ❂*
🔘 *वार ~*सोमवार---------🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
💥🇮🇳 *राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━●═संविधान दिन
महिना : कार्तिक, तिथी : कृ. चतुर्थी
, नक्षत्र : आर्द्रा
योग : शुभ, करण : बव
सूर्योदय: ६.५४ सूर्यास्त: १७.५७
━━━═•●◆❃★❂★❃◆●•═━
💢💢💢🖇🖇🖇
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] सुविचार ❂
----------------------------
*✍आपल्या "हजार" चांगल्या शब्दांचा "अंत" करण्यासाठी.....*
*एका "चुकीच्या" शब्दाकडे*
*"हजार" लोक लक्ष ठेवून असतात.....*
🌺सु🌺वि🎆चा🎆र🌺▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0३] ❂ म्हण ❂*
━━═●═━━
नाव मोठे लक्षण खोटे –
★ अर्थ ::~ कीर्ती मोठी कृती छोटी
➖➖➖➖➖➖➖➖
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••==== *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
⭐अर्थ :: ~
क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
➖➖➖➖➖➖➖
*0५ ] ♦दिनविशेष*♦
★ 26. नोव्हेंबर ★ 🔻====●●●★●●●====🔻
★संविधान दिन
★हा या वर्षातील ३३० वा (लीप वर्षातील ३३१ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००८ : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना ’लष्कर-ए-तैय्यबा’ने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.
●१९९७ : अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर
●१९४९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७२ : अर्जुन रामपाल – अभिनेता
◆१९५४ : वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चा संस्थापक
◆१९३९ : टीना टर्नर – अमेरिकन/स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका
◆१९२३ : राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक
◆१९२१ : व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ - नडियाद, गुजराथ)
◆१८९० : सुनीतिकुमार चटर्जी –आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ,
◆१८८५ : देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय सालसकर, तुकाराम ओंबाळे – मुंबई पोलिस दलातील अधिकारी
●२००१ : चंद्रकांत कृष्णाजी जगताप – शिल्पकार, पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींचा पुतळा, शनिवारवाड्यासमोरील सिंहाची प्रतिमा, सिंहगडावरील तानाजी मालुसरेंचा पुतळा ही त्यांनी घडवलेली काही प्रसिद्ध शिल्पे आहेते.
●१९९४ : भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी
●१९८५ : ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत – रविकिरण मंडळातील एक कवी, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ’महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले. (जन्म: ९ मार्च १८९९)
==●●●★●●●====
▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*६)समुहगित*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
॥चरण चालू दे सदा ध्येयमंदिराकडे
अंतरात आमुच्या स्मृती तुझीच जागु दे॥धृ॥
गती मती द्युती तुझी आमुच्यात येउ दे
सुखात आणि संकटी तुझा मनास ध्यास दे
गतीस खंड त्या नको अम्ही असू सदा खडे॥१॥
पाहुनी सभोवती दुःख दैन्य आपदा
जाणुनी स्वयेच तू त्यागिलीस संपदा
दंभ मोह् लाजले पाहता तुझ्याकडे॥२॥
चरण धुंद चालु दे वेग त्यास येउ दे
ध्येयमंदिरावरी दृष्टि अढळ राहु दे
कवच घालुनी स्मृती सिध्द संगरा खडे॥३॥
धूलिच्या कणांतुनी घोष हा उठे महा
स्पर्श होउनी तुझा देह धन्य हो अहा
वाट पाहता युगे अशी विभूति सापडे॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0७ ] ❂ देशभक्ती गीत ❂
🌇♉♏✡♈♈♈
. *✸ या भारतात बंधुभाव.. ✸*
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे
नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा दे
सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना
हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे
दे वरचि असा दे
जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे
दे वरचि असा दे
सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी
ही नष्ट होउ दे विपत्ती भीती बावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे
दे वरचि असा दे
━┅━═▣◆★✧★◆▣═▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ⚛ प्रार्थणा ⚛
====••◆◆●★●◆◆◆•
तिमिरातुनी तेजाकडे
🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋
09. *❂ तिमिरातुनी तेजाकडे ❂*✶✶✹✹★●★✹✹✶✶
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥
ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥
दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
➖➖➖➖➖➖➖➖
0९]🔵बोधकथा*🔵🤝🤝🤝🤝 🍍🍍🍍🍍🍍🍍
*❃ दैव आणि कर्म ❃ *❃दैव आणि कर्म ❃*
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔ आमच्या गल्लीत एक पानवाला आहे. त्याच्याकडे पाहिले कि असे वाटते कि तो आपलीच वाट पहतो. त्याच्याकडे जो पण ग्राहक गेला कि तो त्याच्याशी गप्पा गोष्टी व चर्चा करत असतो. त्यात त्याला फार आनंद व समाधान वाटत असते. पान बनवतांना त्याचा बरा वेळ जायचा. मी फार वैतागायचो.
एक दिवस मी ठरवले याला फार चर्चा करायची हौस आहे का? आज त्याला असा प्रश्न विचारतो कि त्याने परत चर्चा बंद केली पाहीजे.
मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर देवू शकतो का? तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
मी विचारले कि माणुुस मेहनत करतो मग त्याला यश मिळाले कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले. मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत?
मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो. बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.
त्याने उत्तर दिले, तो म्हणाला मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉजीट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे. लॉकर उघडतानां त्या दोन्ही चाव्या लॉकर ला लावाव्या लागतात तरच तो लॉकर उघडते अन्यथा नाही.बरोबर ना? मी म्हणालो बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाचा काम संबंध?
तो म्हणाला जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात तश्याच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या. एक मेहनत चावी ती आपल्या पाशी असते तर दुसरी नशीब (दैव) चावी ही त्या परमेश्वरा पाशी असते.
आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची, जेव्हा परमेश्वर त्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल अन्यथा नाही.
यशा साठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहे त्या शिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.
मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग व नुसती भक्ती करुन उपयोग नाही.
यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ति दोन्ही आवश्यक आहे.
👍👍👍👍👍👍
•◆•◆•◆★◆•◆•◆•
१०)* *बालगित*
⛔⛔⛔💐💐💐⛔
!. *✹उषःकाल होता होता..✹*
●●●●●००००००●●●●●
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे,पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हां साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतोआमुची खुषाली !
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हांवरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
११ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂🌇🌇🌇🌇🌇🌇🌇▂▂▂▂▂
*१२ ] देशभक्ति चारोळि
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
====••◆◆●★●◆◆◆
➖➖➖➖➖➖
प्राणाहून प्रिय आम्हाला देशाची माती
भिन्न भिन्न जरी भाषा अमुच्या भिन्न भिन्न जरी जाती
✽≡✽≡≡✽≡✧❃✧≡✽≡≡✽≡✽
*१३ )संविधाना बद्ल विशेष माहिती
भारत का संविधान, भारत का सर्वोच्च विधान है जो संविधान सभा द्वारा 26 नवम्बर 1949 को पारित हुआ तथा 26 जनवरी 1950 से प्रभावी हुआ। यह दिन (26 नवम्बर) भारत के संविधान दिवस के रूप में घोषित किया गया है जबकि 26 जनवरी का दिन भारत में गणतन्त्र दिवस के रूप में मनाया जाता है।[1][2][3] भारत का संविधान विश्व के किसी भी गणतांत्रिक देश का सबसे लंबा लिखित संविधान है।
📶📶📶📶📶📶📶
.▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१४ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
━━═•●◆●★◆★●◆●•═━━‘शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!’’
●टोपणनाव बाबासाहेब,
●जन्म :~ १४ एप्रिल १८९१, महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश
●मृत्यू :~ ६ डिसेंबर १९५६, दिल्ली, भारत
●पुरस्कार: भारतरत्न (१९९०)
●वडील :~ सुभेदार रामजी सकपाळ
●आई :~ भीमाबाई रामजी सकपाळ
●पत्नी नाव : ~ रमाबाई आंबेडकर, डॉ. सविता आंबेडकर
◆ डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ◆
हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.
आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना ‘बाबासाहेब’ संबोधीत आहे.
सरकारी शिवजयंती साजरी होते.
─┅━━▣▣▣━━┅─┄🎗🎗🎗🎗🎗🎗🎗
१५) सामान्य ज्ञाण
🎗🎗🎗🎗🎗🎗
24. *✿ वर्षे व ऐतिहासिक घटना ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ १९४८ सप्टेंबर १३ : हैद्राबादमधील पोलीस कारवाई सुरू.
■ १९४८ सप्टेंबर १७ : हैद्राबाद भारतीय संघराज्यात विलीन.
■ १९४८ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केले. मोहन रानडे यांनी (गोवा) जनतेला पोर्तुगीज राजवटीविरुद्ध संघटित केले.
■ १९४९ जानेवारी १ : काश्मीरमध्ये युद्धबंदी लागू.
■ १९४९ नोव्हेंबर २६ : घटना समिती- संविधान स्वीकृत
➖➖➖➖➖➖
🎆🎆🎆🎆🎆🎆🎇
१६) *26 पाढा* * * *चा*
🎄🎄🎄🎄🎄🎄
26, 52,78,104,130,156,182,
208,234,260
✴✴✴✴✴✴✴✴✴🌴✴
*विनम्र अभिवादन..!!*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*संकलन*
*बालचंद चौधरी*
*प्रा*पदविधर*
*के*प्रा*शा*डवाळा*
*वैजापुर*
*.9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂🌺सहकार्य🌹
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 १)संजय गायकवाड वैजापुर. ISO मु अ
२) डोईफोडे सर बुलढाना
३) वाळुंज सर व आत्रम सर*
४) ता. कां. कदम
५) विलास शिरोले, ६). *vaibhav* *Cheke*
🙏🙏🙏🙏🙏🙏🌅🙏
*✧
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ बुधवार 26/11/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ BVC VAIJAPUR ⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment