🌏 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐
🌹परीपाठ*🌹
❂ दिनांक:~ 0 6/ 12/2018
🔘 *वार :- गुरुवार----🔘
➿➿➿➿➿➿➿➿
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
🌅 * बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔ 9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
सौजन्य - नितीन केवटे, समूह प्रमुख
भालचंद्र भोळे, मुख्य प्रशासक
..•●◆●★TSS★●◆●•═━━
अधिक अपडेट साठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या
http://tssmaha.blogspot.com/?m=1
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*💥🇮🇳 *राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*01 ] ❂ आजचे पंजाग 🔯
┄कृष्ण पक्ष चतुर्दशी
नक्षत्र : अनुराधा
योग : सुकर्म
करण : शकुनी
सूर्योदय : 06:58
सूर्यास्त : 18:00
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*0२ ] सुविचार
💒💒💒💒💒💒💒💒
शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
🈴🈴🈴🈴🈴📖📖📖📖
( 3)म्हण वत्याचा अर्थ
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
पालथ्या घड्यावर पाणी –*
*★ अर्थ ::~*
सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
➖➖➖➖➖➖➖
(4) ❂ प्रार्थना❂
➿➿➿➿➿➿➿➿
*❂ शुभंकरोति म्हणा मुलांनो ❂*
━━═●✶✹★●★✹✶●═━━
दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम्, शुभंकरोति कल्याणम्
जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा
या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना
दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानी कुंडल मोतिहार
दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना
➖➖➖➖➖➖➖➖➖
*05 ] 💠💠 सुभाषीत💠💠💠
====••◆◆●★●◆◆◆••====
. *पृथ्विभूषणं राजा ।*
⭐अर्थ ::~
राजा हा पृथ्वीचे भूषण आहे.
➖➖➖➖➖➖➖
*06] ♦दिनविशेष*♦
★★==
समता दिन
★ हा या वर्षातील ३४० वा (लीप वर्षातील ३४१ वा) दिवस आहे.
★ महापरिनिर्वाण दिन
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
●१९८१ : डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.
●१९७८ : स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.
●१९७१ : भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३२ : कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक
◆१९२३ : वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार
◆१९१६ : ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार
◆१८६१ : रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक
◆१८५३ : हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार
◆१८२३ : मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत
◆१७३२ : वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
(जन्म: १८ जुलै १९१८)
●१९७६ : क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००)
●१९७१ : कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक
●१९५६ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
( 7)समुहगित*
💠💠💠💠💠💠💠
चरण चालू दे सदा ध्येयमंदिराकडे
अंतरात आमुच्या स्मृती तुझीच जागु दे॥धृ॥
गती मती द्युती तुझी आमुच्यात येउ दे
सुखात आणि संकटी तुझा मनास ध्यास दे
गतीस खंड त्या नको अम्ही असू सदा खडे॥१॥
पाहुनी सभोवती दुःख दैन्य आपदा
जाणुनी स्वयेच तू त्यागिलीस संपदा
दंभ मोह् लाजले पाहता तुझ्याकडे॥२॥
चरण धुंद चालु दे वेग त्यास येउ दे
ध्येयमंदिरावरी दृष्टि अढळ राहु दे
कवच घालुनी स्मृती सिध्द संगरा खडे॥३॥
धूलिच्या कणांतुनी घोष हा उठे महा
स्पर्श होउनी तुझा देह धन्य हो अहा
वाट पाहता युगे अशी विभूति सापडे॥४॥
➖➖➖➖➖➖➖➖➖
08]बोधकथा
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
. *❃ धनगर व्यापारी झाला ❃
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*एक धनगर समुद्राकाठी बसून मेंढ्या चारीत असता समुद्र पाहून फार मोहीत झाला.* तेव्हा समुद्र अगदी शांत होता व त्यावर गलबते फिरत होती. ते पाहून आपणही समुद्रात व्यापार करावा असे त्यास वाटले व त्याने मेंढ्या विकून एक गलबत विकत घेतले व तो माल भरून व्यापारास निघाला. परंतु वाटेत मोठे वादळ झाले व त्यामुळे गलबत बुडू नये म्हणून सगळा माल त्याला समुद्रात फेकून द्यावा लागला. शेवटी त्याचे जहाज एक खडकावर आपटून फुटले व तो कसाबसा वाचला.
यानंतर त्याने ज्या माणसाला आपल्या मेंढ्या विकल्या होत्या, त्याच्याकडे तो मेंढ्या राखण्यासाठी चाकरी करू लागला. असाच एकदा पुन्हा तो समुद्रकाठी आला असता समुद्राकडे बघून म्हणाला.
'आता काही मी तुला विसरणार नाही. तुझं स्वरूप मला चांगलं समजलं आहे.'
➖➖➖➖➖➖➖➖◆•◆
9)* *बालगित
💠💠💠💠💠💠💠
➡एक नाही दोन नाही, बेरीज-वजाबाकी नाही
तीन नाही चार नाही, भुमितीची सजा नाही
दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा
सोमवारचा असतो गणिताचा तास
गणिताच्या तासाला मी नापास
गणित विषय माझ्या नावडीचा
भलताच कठीण तो मंगळवार
डोक्यावर असतो भूगोलाचा भार
भूगोल विषय माझ्या नावडीचा
घेऊन तोफा आणि तलवारी
इतिहास येतो बुधवारी
इतिहास माझा नावडीचा
➡➡➡➡➡
🏯🏯🏯🏯🏯🏯🏯🏯🏯
10 ] देशभक्ति गीत
🗑🗑🗑🗑🗑🗑🗑🗑🗑
...*✸ उठा राष्ट्रवीर हो ✸*
●●●●●००००००●●●●●
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला, उठा राष्ट्रवीर हो
युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला
वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला
चंद्रगुप्त वीर तो फिरुन आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला
उठा उठा, चला चला
यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला===================
11] थोरपुरुष माहिती
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
29. *❒ शि.द. फडणीस ❒*
━━═•●◆●★★●◆●•═━━
पूर्ण नाव :~शिवराम दत्तात्रेय फडणीस
*●जन्म:~ २९ जुलै १९२५*
भोज, बेळगाव जिल्हा, भारत
●प्रशिक्षण :~ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई
●शैली :~ व्यंगचित्र
●प्रसिद्ध कलाकृती :~ हसरी गॅलरी, मिस्किल गॅलरी
◆ शिवराम दत्तात्रेय फडणीस ◆ हे मराठी व्यंगचित्रकार आहेत.
त्यांची व्यंग्यचित्रं बघत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या.
त्यांच्या व्यंग्यचित्रांमुळं चित्रकला सामान्यांपर्यंत पोहोचली.
आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने फडणीस यांनी पाच दशकांहून अधिक वर्षे वाचकांना हसवले आहे. व्यंग्यचित्रे ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज फडणिसांच्या चित्रांनी खोटे ठरवले.
विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले, आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला.त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी अनेक नियतकालिकांची, पुस्तकांची मुखपृष्ठे सजली.
*पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकांची लज्जतही त्यांच्या चित्रांनी वाढवली.*
*◆ बालपण ◆*
बेळगाव जिल्ह्यातले भोज हे शि.द. फडणिसांचे जन्मगाव असले, तरी ते कोल्हापुरात वाढले. कोल्हापुरात चित्रकलेसाठी अतिशय पोषक असे वातावरण होते. मंडईत, किंवा रंकाळ्याला वगैरे ठिकाणी स्केचिंगसाठी मुले जात असतात. फडणीसही या मुलांमध्ये असत. चित्रकलेतली साक्षरता तपासणार्या एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट ग्रेडच्या परीक्षा शि.द. फडणिसांनी दिल्या, तेव्हा आपल्यातही एक चित्रकार दडला आहे, हे त्यांना कळाले.. कलाशिक्षणाची पंढरी असलेल्या मुंबईतील जे. जे. कलामहाविद्यालयात मग त्यांनी प्रवेश घेतला.
*◆ कारकीर्द ◆*
जे. जे. मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि व्यंगचित्रकलेची अतिशय आवड असल्याने शि.द. फडणीस हे अनंत अंतरकर यांच्या मदतीने पुण्याला गेले.
तेंव्हापासून त्यांची चित्रे ’हंस’, ’मोहिनी’, ’नवल’, या मासिकांतून आणि अनेक पुस्तके व नियतकालिकांतून प्रसिद्ध होत राहिली.
पुढे १९५२ सालापासून सलग साठ वर्षं अंतरकरांच्या 'मोहिनी'च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ रेखाटण्याचा विक्रमही शिदेंनी केला. त्यांची अनेक चित्रे *इंटरनॅशन सलून ऑफ कार्टून्स, माँत्रियाल, कॅनडा येथेही प्रदर्शित करण्यात आली आहेत.*
*हसरी गॅलरी , 'चित्रहास', 'चिमुकली गॅलरी' ही चित्रांची प्रदर्शनेही ४० वर्षांत जवळजवळ २० वेगवेगळ्या शहरात मांडण्यात आली आहेत..*
चित्रकारांची चित्रे त्यांच्या परवानगीशिवाय वापरली जाऊ नयेत यासाठी, शि.द. फडणीस यांनी कायद्याच्या मदतीने प्रताधिकाराचे, म्हणजे कॉपीराइटचे हक्क चित्रकारांना मिळवून दिले.
*🏆सन्मान आणि पुरस्कार🏆*
कमर्शियल आर्टिस्ट्स गिल्डने (कॅग) आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनात शि.द. फडणीस यांचे १९५४ सालच्या 'मोहिनी'च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ निवडले गेले होते. असे होणे मोठे प्रतिष्ठेचे समजले जाते.
महाराष्ट्राच्या शालेय पाठ्यपुस्तक मंडळाने गणिताच्या पुस्तकांमध्ये फडणिसांच्या चित्रांचा समावेश केला आहे.
*गणितातल्या अमूर्त संकल्पना चित्रांद्वारे पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांसमोर मांडणे हे विलक्षण अवघड काम शि.द. फडणिसांनी केले, आणि त्या चित्रांनी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांच्या मनातली गणिताची भीती कमी केली.*
*जर्मनी, इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली होती.*
शि.द. फडणीस यांना ’सृजन कोहिनूर नावाचा पुरस्कार (२५ हजार रुपये रोख आणि मानपत्र) मिळाला आहे.
*बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट्सने त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.*
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'कार्टुनिस्ट कंबाईन' या संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार (एप्रिल २०१६)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🎆🎆🎆🎍🎍🎆🎆🎆🎆
====••◆◆●★●◆◆◆••====
14] ❂ सामान्य ज्ञान ❂*💠💠💠🔘🔘💠
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
*✿ राष्ट्रीय माहिती ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
*★आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती?*
➡ राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत,राजमुद्रा
*★ आपले राष्ट्रीय सण कोणते?*
➡ स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन
*★ राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे?*
➡ सामर्थ्याचे
*★ भारताचे ब्रीदवाक्य/ध्येयवाक्य कोणते?*
➡ सत्यमेव जयते
*★ भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे?*
➡ सारनाथ-अशोकस्तंभ
▂📖📖📖📖📖📖📖
15)आजचे इंग्रजि शब्द
❄❄❄❄❄❄❄
१)Win - जिंकने
२)Go - जा
३)Help - वाचवा
४)Jump - उड़ी मारा
५)Stop - थांबा
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║
गुरुवार
🈴🈴🈴🈴
6/12/2018 ◆*
🌐 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐
🌀🎯 धरुनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची 🎯🌀
❄❄❄❄❄❄❄❄
🖕माझ्या blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
समाप्त
➖➖➖➖
No comments:
Post a Comment