Tuesday, December 25, 2018

26/12/2018 चा बुधवारचा परीपाठ

🌀🌈🌈🌈🌈🌈🌀
🕳परीपाठ🕳
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
❂ दिनांक:~  
     २६/१२/२०१८
🔘 *वार :- बुधवार
📎➿➿➿➿➿📎
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
*बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
🎯 पंचाग🎯
💹💹💹💹💹💹💹
➖➖➖➖➖➖
ग्राहक दिन
महिना : मार्गशीर्ष, तिथी : कृ.चतुर्थी, नक्षत्र : आश्लेषा
योग : विष्कंभ, करण : कौलव
सूर्योदय: ७.११ सूर्यास्त: १८.०७
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌ 2] !!सुविचार !!
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
अगदी सरळमार्गी असणे हेही एक
प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने
मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते
🌈 ❄❄❄❄❄🌈
3)आजची म्हण
📒📒🚬🚬🚬📰📰कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच.
अर्थ:
➖➖➖
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही
➖➖➖➖➖➖➖
४)🌐 दिनविशेष 🌐
➿➿➿➿➿➿➿
२००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.
१९४८ - डॉ. प्रकाश आमटे
१९४१ - लालन सारंग – रंगभूमीवरील कलाकार
१९३५ - डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका
१९२५ - पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक
१९१७ - डॉ. प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये स्वप्नमभंग, अनुक्षण, मेपल हे काव्यसंग्रह; एक तारा, दर्दके पाबंद इ. कादंबर्या०; नाट्यचर्चा, समीक्षा की समीक्षा आदींचा समावेश आहे.
१९१४ - डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक
१९१४ - डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे.
१८९३ - माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते
१७९१ - चार्ल्स बॅबेज – इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ, पहिल्या यांत्रिकी संगणकाचा जनक
➖➖➖➖➖➖➖
‌(५) ❂ प्रार्थना❂
🔌🔌🔌🔌🔌
तुला आळवीता जीवन सरावे
अनंता तुझे रूप नेत्री भरावे
तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती
तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती
तुला अर्पितो ही पुजा भक्‍तीभावे
तुझ्यावीण आम्हां नसे कोण त्राता
अनाथास तू नाथ, तू विघ्‍नहर्ता
तुला संकटी मी सदाही स्मरावे
जगन्‍नायका रे नको अंत पाहू
मना मोही माया, किती काळ साहू
निराकार हे रूप साकार व्हावे
➖➖➖➖➖➖➖
0६ ]🔯सुभाषित🔯
|च्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे |
तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय  नुमः
अर्थ
‌♦♦♦♦♦
खरोखर कोकीळ हा [अन्तर्बाह्य] काळाकुट्ट आहे, तो तांबड्या लाल डोळ्यांनी [रागानेच] बघतो. दुसऱ्यांच्या पिल्लांचा द्वेष तर करतोच, पण स्वतःच्या पिलांचा देखील सांभाळ करीत नाही. तरीसुद्धा तो सर्व जगाचा अत्यंत आवडता असतो. मधाळ बोलणाऱ्यांच्या दोषांचा कधीही विचार केला जात नाही. [साखरपेर्‍या भाषेमुळे लोक फसतात आणि त्यांची गैरकृत्य लपतात.]
➖➖➖➖➖➖➖
‌0७] 🌀बोधकथा🌀
 ➖➖➖➖➖➖➖
श्रीगणेश ला एकदंत नाव का पडले ?
कार्तवीर्याचा वध करून कृतार्थ झालेला परशुराम कैलासावर आला. तिथे त्याची सर्व गणांशी आणि गणाधीश गणपतीचीही भेट झाली. शंकरांच्या दर्शनाची इच्छा परशुरामाच्या मनात होती. परंतु शिव-पार्वतीची ती विश्रांतीची वेळ होती.
परशुराम गणेशाला म्हणाला, ‘अरे, मी परमेश्वराला नमस्कार करण्यासाठी अंतःपुरात जातो आहे. प्रणाम करून मी ताबडतोब परत येईन. ज्याच्या कृपेने मी कार्तवीर्य मारला, एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली, त्या जगदगुरूला शक्य तितक्या लवकर मला भेटलेच पाहिजे.’ हे ऐकताच गणेशाने सांगितले, ‘अरे, तू थोडा वेळ थांब.’
परंतु गणेशाचे बोलणे न मानता हातातील परशु सरसावून परशुराम निर्भयतेने आत जाण्यास निघाला, तेव्हा गणेशाने उठून त्याला अडविले. प्रेमाने, नम्रतेने बाजूस सरले. तेव्हा रागाने त्याला मारण्यासाठी परशुरामाने परशु उचलला. त्या धकाधकीत गणेश खाली पडला, पण तरीही स्वतःला सावरून धर्माला साक्ष ठेवून त्याने पुन्हा परशुरामाला आत न जाण्याबद्दल बजावले. तरीही परशुराम ऐकेना. तेव्हा मात्र स्वतःची सोंड कोटी योजने वाढवून त्यात त्याला गुरफटवून सारे सप्त लोक हिंडवून आणले. त्या भ्रमणाने शुद्ध गेलेला परशुराम जेव्हा सावध झाला तेव्हा गुरु दत्ताने दिलीले स्तोत्रकवच म्हणून त्याने गणेशावर स्वतःचा परशु टाकला. तो व्यर्थ करण्यासाठी स्वतःचा डावा दात गणेशाने पुढे केला. पर्शुचा वार फुकट गेला, पण तो गणेशाचा दात मात्र तुटून पडला.
सगळीकडे एकाच गोंधळ उडाला. सर्वजण जमा झाले. त्या गडबडीने शंकर-पार्वतीही बाहेर आली. सर्व समजल्यावर पार्वती परशुरामाला म्हणाली, ‘अरे, राम, तू ब्राह्मणवंशात जन्मलास आणि पंडितही आहेस. जमदग्नीचा पुत्र असून योगीराजांचा तू शिष्य आहेस. तुझी आई, मामा, आजोबा सारेच मोठे, मग तू कोणत्या दोषाने असा वागलास? अमोघ असा परशु घेऊन कोणीही  सिंहाला मारू शकेल, तसा तू परशु या गणेशावर चालविलास. तुझ्यासारख्या कोटी कोटी रामांना मारण्यास हा गणेश समर्थ आहे. अरे, हा गणेश कृष्णांश आहे. मोठ्या व्रताच्या प्रभावाने हा झाला आहे.
श्रीविष्णु म्हणाले, ‘हे देवी पार्वती, माझे थोडे ऐक. तुला हा गजानन आणि कार्तिकेय जसा, तसाच हा परशुराम आहे. यांच्यावरील स्नेहात आणि प्रेमात काहीच भेद नाही. ‘आजपासून तुझ्या या मुलाचे नाव एकदंतही पडले आहे. त्याची एकूण आठ नावे आहेत- गणेश, एकदंत, हेरंब, विघ्ननायक, लंबोदर, शूर्पकर्ण, गजवक्त्र, गुहाग्रज ही ती नावे होत.’ असे सांगून श्रीविष्णूंनी गणेशस्तोत्र कथन केले व म्हटले, ‘हे दुर्गे, याच्यावर या परशुरामावर रागावू नकोस. त्या गणेशाचे एकदंत हे एक नाव या घटनेनेच प्राप्त झाले आहे. त्या घटनेमधील पुत्रवत असलेल्या परशुरामाला अभय दे.’ तेव्हापासून श्रीगणेश एकदंत झाला.
➖➖➖➖➖➖➖
‌ (८) 🍥बालगित🌞
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
या वार्‍याच्या बसुनी विमानी सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची
आज पौर्णिमा जमले तारे आकाशाच्या वर्गात
चांदोबा गुरुजी तर दिसती कुठल्या मोठ्या मौजात
हसुनी चांदण्या करीती किलबील अपुल्या इवल्या डोळ्यांची
द्वितीयेपासून रोजची येती गुरुजी उशीरा शाळेत
मुले चांदणी फुलती आणिक सगळी अपुल्या गमतीत
कधी वर्गातून पळते उल्का ओढ लागुनी पृथ्वीची
कुणी तेजाचे ओठ हलवूनी मंगळास वेडावित असे
रागाने मग मंगळ वेडा गोरामोरा होत असे
बघुनी सारे हसता हसता उडते चंगळ तार्‍यांची
कधी वेळेवर केव्हा उशीरा, अवसेला तर पूर्ण रजा
राग कधी ना या गुरुजींना, कधी कुणा करीती ना सजा
असे मिळाया गुरुजी आम्हां करू प्रार्थना देवाची
⭐⭐⭐⭐⭐🌟-http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1-----------------------
🌞🌞🌞🌞🌞🌞
‌९)🍭देशभक्ति गीत  🍭
===============
हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी
जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी
अपनी छतरी तुमको दे दें कभी जो बरसे पानी
कभी नए पैकेट में बेचें तुमको चीज़ पुरानी
फिर भी दिल है हिन्दुस्तानी
नींद उड़ रही है ...
थोड़े अनाड़ी हैं थोड़े खिलाड़ी
रुक रुक के चलती है अपनी गाड़ी
हमें प्यार चाहिए और कुछ पैसे भी
हम ऐसे भी हैं हम हैं वैसे भी
हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी
उल्टी सीधी जैसी भी है अपनी यही कहानी
थोड़ी हममें होशियारी है थोड़ी है नादानी
थोड़ी हममें सच्चाई है थोड़ी बेईमानी
फिर भी दिल है ...
आँखों में कुछ आँसू हैं कुछ सपने हैं
आँसू और सपने दोनों ही अपने हैं
दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है
उम्मीद का दामन छूटा तो नहीं है
हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी
थोड़ी मजबूरी है लेकिन थोड़ी है मनमानी
थोड़ी तू तू मैं मैं है और थोड़ी खींचातानी
हममें काफ़ी बातें हैं जो लगती हैं दीवानी
फिर भी दिल है
➡➡➡➡➡➡➡➡➡
(१०)🍃आजचा   पाढा🍃
🌈🌈🌈🌈🌈🔯
26, 52, 78, 104,130,156 ,182,208,234 260
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌(११)❄बडबडगित❄
देवा तुझे किती सुंदर आकाश,
सुंदर प्रकाश सूर्य देतो |
सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर,
चांदणे सुंदर पडे त्याचे |
सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे,
किती गोड बरे गाणे गाती |
सुंदर वेलींची सुंदर ही फुले,
तशी आम्ही मुले देवा तुझी |
इतुके सुंदर जग तुझे जर,
किती तू सुंदर असशील |
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
१२)📯थोरव्यक्ती🌈
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
राणी लक्ष्मीबाई
लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.

➕➕➕➕➕➕➕


1३)🌀आजचा अनमोल विचार🌀
स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत
⏩⏩ bvc➖➖➖➖
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌१४)🌀 समुहगित 🌀
अंतरी अपुल्या असावी एकतेची आस
एकता निर्मू अशी जी संपवी वनवास॥धृ॥
सर्व सुखी जन सर्वही त्राते
सर्व सारखे सर्वही भ्राते
दुःख खिन्नता भिन्नता नेइल जी विलयास॥१॥
परंपरेचा ध्वज संस्कृतिचा
केन्द्र मानुया सकल कृतीचा
पक्ष भेद वा मतमतांतरे ठरोत की आभास॥२॥शक्तिशालिनी नव स्वतंत्रता
तशीच योजू निज कल्पकता
देश आपुला अखंड करु या लागो एकच ध्यास॥३॥
घराघरातुन राष्ट्रहितास्तव
निघोत सेवक वाढो वैभव
भावी भारत अभिमानाने स्मरेल तो इतिहास॥४॥
सामावुनिही घेइल जगता
अशी सुमंगल भारतियता
मांगल्याच्या विश्वशांतिच्या देइल संदेशास॥५॥
------------------------❄❄❄❄
१५)🌈साम्यानज्ञआजच्या 🖨🖨🖨🖨🖨🖨🖨
🔹 *!! भारतातील सर्वात उंच, सर्वात मोठे (साम्यानज्ञान) !!* 🔹
▪सर्वात मोठा तलाव ---------- चिल्का (ओरिसा)
▪सर्वात उंच दरवाजा ---------- बुलंद दरवाजा,
▪सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ---------- भारतीय स्टेट बँक
▪सर्वात मोठा जिल्हा---------- लढाख
▪सर्वात जलद ट्रैन ---------- शताब्दी एक्सप्रेस (दिल्ली----------भोपाळ)
▪सर्वात जास्त समुद्र किनारा असणारे राज्य ---------- गुजरात, १६६० किमी
▪सर्वात लांब रेल्वे मार्ग ---------- आसाम ते कन्याकुमारी, ४२७२ किमी
▪क्यूबा ----------जगातील साखरेचे कोठार.
▪गंगटोक ----------सिक्कीमची राजधानी.
▪गंगा ----------भारताची राष्ट्रीय नदी.
💿💿💿💿💿💿
१६)आजची देशभ्त चारोळी
🎻🎷🎷🎷🎷🎷🎸
📘📘📘📘📗📙📙
प्राणाहून प्रिय आम्हाला देशाची माती
भिन्न भिन्न जरी भाषा अमुच्या भिन्न भिन्न जरी जाती !
स➖मा➖प्त➖➖🔽 बालचंद चौधरी
9545238102
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment