*✽≡❃≡≡❂≡✧❃✧≡❂≡≡❃≡✽*
*❒ अटलबिहारी वाजपेयी ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
अटलबिहारी वाजपेयी हे माजी भारतीय पंतप्रधान आणि हिंदी कवी होते. यांची जयंती त्यानिमित्त त्यांना
*विनम्र अभिवादन..!!*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*दिव्यत्वाची जेथ प्रचीती*
*तेथे कर माझे जुळती ..!!*
🙏🥀🌷🌹🌷🥀🙏
●जन्म :~ २५ डिसेंबर १९२४
ग्वाल्हेर, ग्वाल्हेर राज्य, ब्रिटिश भारत
●मृत्यू :~ १६ ऑगस्ट २०१८
●राजकीय :~ पक्ष भारतीय जनता पक्ष
*●राजकीय प्रवासाची सुरूवात●*
राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने आला. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते थोड्याच दिवसांनी श्याम प्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले. तरूणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा तसेच आदरही मिळवला.त्याची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात. खुद्द जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.
✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
http://balchandchaudhari.blogspot.com/
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
देशाच्या राजकारणातला भाजपाचा विस्तार होत राहिला. १९९५ च्या मार्चमध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५ च्या अधिवेशनात अडवाणी यानी वाजपेयी याचे नाव १९९६ च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.
*★पंतप्रधान पद★*
*पहिली खेप* (मे १९९६)
१९९६ च्या निवडणुकात भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षामुळे १९९६ ची लोकसभा त्रिशंकु राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले.
सर्वस्वाचा त्याग करुन आयुष्यभर संघटनेला समर्पित झालेला हा कार्यकर्ता, 15 मे 1996 रोजी देशाचा पंतप्रधान झाला. राजकीय जीवनात अतिशय व्यस्त असूनदेखील अटलबिहारींनी आपले संवेदनशील मन जिवंत ठेवलं..
वाजपेयी यानी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्ताव चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी १३ दिवसात राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळलं.
🏗🏗🏗🏗🏗🏗🏗
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://balchandchaudhari.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*दुसरी खेप* (मार्च १९९८)
१९९६ ते ९८ दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. दैवेगोडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे लवकरच कोसळली. १९९८ च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रा.लो.आ.) ( NDA - National Democratic Alliance), ची स्थापना केली. अखेर १९९८ च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारत पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले. या दुसऱ्या खेपेत वाजपेयींनी स्वतःच्या राजकारणाची आणि कणखरतेची छाप सोडली होती. त्याचे काही महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे होते.
★ अणुचाचणी पोखरण ★
२ मे १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणार्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या. २ आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रात निर्बंध लादले. तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे याची झळ लागली नाही. अखेर भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या चाचण्या लाभदायीच ठरल्या.
*★कारगील युद्ध★*
कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी आहे. लाहोर भेटीत दोन देशादरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्न करत असतांना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. हिवाळ्यात काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अतिउंचावर असलेल्या चौक्यांवर -५० पर्यंत तापमान घसरत असल्याने दोन्ही देशांकडून खाली केल्या जात. उन्हाळा सुरू होताच दोन्ही देशाचे सैनिक परत चौकीवर रुजू होत. पण १९९९ च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवली. यातल्या कित्येक सैनिक आणि अधिकाऱ्यांजवळ त्यांची पाकिस्तानी ओळखपत्रे ही होती. तसेच सोबतीला काही भाडोत्री दहशतवादीही होते.
उन्हाळा सुरू होताच भारतीय सैन्याच्या ध्यानात ही बाब आली. आणि जून १९९९मध्ये ऑपरेशन विजय सुरू केले. भारतीय सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अतिउंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. तरी हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव दिसू लागला. नवाझ शरीफ यानी याही परिस्थितीचे भांडवल करून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचा प्रयत्न केला. चीनला भेट देउन त्यांनी मदतीची याचना केली. पण भारताने मोठ्या शिताफीने ऑपरेशन विजयची कारवाई नियंत्रण रेषेपर्यंतच मर्यादित ठेवली होती. भारताच्या पवित्र्यापुढे चीनने हस्तक्षेप नाकारला. नवाझ शरीफ यांनी मग अमेरिकेकडे मद्तीची याचना केली. तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत.वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले. पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण सरळ धुडकावून लावत नकार दिला. यामुळे अमेरिकेला जागतिक पोलीस समजण्याच्या प्रवृत्तीला सणसणीत उत्तर गेलेच पण काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप करवून शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न शिताफीने उधळला.
*तिसरी खेप*
(ऑक्टोबर १९९९ - मे २००४)
१९९९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडीला(रालोआला) घवघवीत यश मिळाले आणि वाजपेयींनी सलग तिसर्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
*★पुरस्कार★*
◆१९९२, पद्मविभूषण पुरस्कार
◆१९९३, डी. लिट. कानपूर विश्वविद्यालय
◆१९९४, लोकमान्य टिळक पुरस्कार
◆१९९४, उत्क्रृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार
◆२०१४, भारतरत्न
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*🌸००•●◆★💥★◆●•००🌸*
🌐बालचंद चौधरी🌐
●█║▌│║║█║█║▌║║█║▌●
No comments:
Post a Comment