Friday, December 7, 2018

22/11/2018 चा परीपाठ

*22/11/2018 चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
*🌅 * बालचंद चौधरी* *वैजापुर* 9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━

====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~   22/11/2018 ❂*
 🔘 *वार ~*गुरुवार🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
💥🇮🇳 *राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━●═━━
राष्ट्रीय ग्राहक दिन
महिना : कार्तिक, तिथी : कृ. प्रतिपदा
कृ. द्वितीया
, नक्षत्र : रोहिणी
योग :  शिव सिद्ध, करण : तैतिल
सूर्योदय: ६.५३ सूर्यास्त: १७.५७
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
   💢💢💢💢💢         
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हण ❂*
━━═●═━━
एका माळेची मणी,ओवायला नाही कुणी!
➖➖➖➖➖➖➖➖
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
परिचरितव्याः सन्तो यद्यपि कथयन्ति नो सदुपदेशम् |
यास्तेषां स्वैरकथास्ता एव भवन्ति शास्त्राणि ||
➖➖➖➖➖➖➖➖
*0५ ]    ♦दिनविशेष*♦विशेष : २१ नोव्हेंबर : भाषिक सुसंवाद व

हा या वर्षातील ३२५ वा (लीप वर्षातील ३२६ वा) दिवस आहे.

महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन
सेना दिवस (बांगला देश)
सेना दिवस (ग्रीस)
World Television Day
       'English' ही जगात सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. ती इंडो-युरोपिअन कुटुंबाच्या जर्मेनिक गटातील भाषा आहे. तिचे ’इंग्रजी’ हे मराठीतील नाव पोर्तुगीज भाषेतून घेतले आहे. मुळात इंग्लंडची असणारी ही भाषा इंग्लंडच्या ताब्यात असणार्‍या जगातील अनेक भागांत पसरली आहे. आजही भारतातील अरुणाचल प्रदेश व नागालँड या राज्यांची ती राजभाषा आहे!भाषिक सुसंवाद
*महत्त्वाच्या**घटना
♈♈♈♈♈
१९७२:दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.
१९७१:बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.
१९६२:भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
१९४२:राजा नेने दिग्दर्शित ’दहा वाजता’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
जन्मदिवस / जयंती / *वाढदिवस*
⚛⚛⚛⚛
ईशा करवडेशं. ना. नवरेप्रेम नाथव्होल्टेअर
ईशा करवडेशं. ना. नवरेप्रेम नाथव्होल्टेअर
१९८७:ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू
१९२७:शं. ना. नवरे –, लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)
१९२६:प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)
१६९४:व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक (मृत्यू: ३० मे १७७८)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
🌄🌄🌄🌄🌄
१९९६:डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम (जन्म: २९ जानेवारी १९२६ - संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)
१९७०:सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक (१९३०) विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)
१९६३:चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (जन्म: १९ जानेवारी १८९२)

==●●●★●●●====
▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*६)समुहगित*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
अविरत पुढे पुढे जाऊ
अम्हि ना विश्रांति आता घेऊ॥धृ॥

उध्दराया पूर्वज शापित घोर आचरुनि तप हे अविरत
मुक्ति मिळवुनी देइ भगीरथ सातत्याने भगीरथाच्या
पुढे पुढे जाऊ॥१॥

शांत सागरी सेतू बांधून नष्ट कराया संकट दारूण
जाई वानरासह रघुनंदन त्या धैर्याने रघुरायच्या
पुढे पुढे जाऊ॥२॥

स्वर्गी तो देवेन्द्र कोपला गारायुत पर्जन्य वर्षला
गोवर्धन गोपांनि उचलला चातुर्याने श्रीकृष्णाच्या
पुढे पुढे जाऊ॥३॥

धुमाकुळ यवनांचा चाले आवर घाली शिवराय बळे
घेवुनि संगे मित्र मावळे त्या शिवराया साक्ष ठेवुनी
पुढे पुढे जाऊ॥४॥सत्याच्या अन् धैर्याच्या चातुर्याच्या संघटनेच्या
मातृभूमिच्या उध्दाराच्या महाजनांच्या त्याच पथाने
पुढे पुढे जाऊ॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0७ ]  ❂ देशभक्ती गीत ❂
🌇♉♏✡♈♈♈
हा आमुचा हिंदुस्थान अम्हाला प्यार
जरि एकचि नसते उणे जगावर गाजविता अधिकार॥धॄ॥

श्री रामचंद्र अवतारला
भूलोक स्वर्ग हा बनला
सदगुण तो शिखरी चढला
मंथरा -कैकयी मुळे परि झाला हाहाःकार॥१॥

ये शिकंदरची स्वारी
रजपूत खडग त्या भारी
शौर्यची शिकस्त झाली
परि फंदफितुरी घूसे घरांमधि परका दे मग मार॥२॥

शिवराय उभारी झेंडा
मोऱ्यांचा मार्गी धोंडा
मोडिले तयाच्या बंडा
परि त्याच ठिकाणी पिसाळ झाला सुर्या अंधःकार ॥३॥

ही पराक्रमाची ज्योत
तव शील-बुध्दिचा पोत
हे सुयश व्यर्थ तरी होत
परि गालबोट हे सुपुत्र सारे पुसतील केव्हा पार ॥४॥ ━┅━═▣◆★✧★◆▣═▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]     ⚛ प्रार्थणा ⚛
====••◆◆●★●◆◆◆•
नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा
बंधुहो, जयजयकार करा
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.

विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत
निरंतर असो तुझे स्वागत
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.

आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती
बुद्धिचे वसंत जे विकसती
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.

विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी
दीप्‍ती जी चित्तमयूरावरी
त्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी.

हे वाग्देवी, असे प्रार्थना ये या संकीर्तना
उत्सवा ये या संकीर्तना
जगन्मंगले, सकल मंगलासह दे पददर्शना.

सगुण शांत त्वच्‍चित्रमूर्तिला गातो मी गायन
शारदे गातो मी गायन
धन्य धन्य सौंदर्य, धन्य त्वत्प्रसन्‍नपुण्यानन.

किरिट शोभला त्वन्मौलीला अमूल्य तत्वांचा
शारदे अमूल्य तत्वांचा
अरुणराग त्यातून उधळला सद्गुणरत्‍नांचा.

डोले कंठी सच्छास्‍त्रांचा चंद्रहार हासरा
पाहुनी चंद्रहार हासरा
भाली फुलला, गाली खुलला काव्यदिव्यबिजवरा.

सौंदर्याहुनि दिव्य दिव्यतर हिचे ज्ञान सुंदर
खरोखर हिचे ज्ञान सुंदर
त्या ज्ञानाहुनी जगात सुंदर एकच परमेश्वर.

हृदयमंदिरी प्राणशक्‍तीचे झोपाळे डोलवी
देवि ही झोपाळे डोलवी
सुखदु:खांचे देउनि झोके जिवांना खेळवी.

विचारकारंज्यावर तुषार शब्दांचे नाचवी
देवि ही शब्दांचे नाचवी
जिवात्मा त्यातून बोलवी परमात्मा डोलवी.

चराचरांचा दावि चित्रपट अमुच्या स्मरणावर
भराभर अमुच्या स्मरणावर
विजेऐवजी त्यात जळे चित्‍चंद्राचे झुंबर.
➖➖➖➖➖➖➖➖
*0९]🔵 बोधकथा*🔵🤝🤝🤝🤝    
  *❃ दैव आणि कर्म ❃*
                              
    आमच्या गल्लीत एक पानवाला आहे. त्याच्याकडे पाहिले कि असे वाटते कि तो आपलीच वाट पहतो. त्याच्याकडे जो पण ग्राहक गेला कि तो त्याच्याशी गप्पा गोष्टी व चर्चा करत असतो. त्यात त्याला फार आनंद व समाधान वाटत असते. पान बनवतांना त्याचा बरा वेळ जायचा. मी फार वैतागायचो.

       एक दिवस मी ठरवले याला फार चर्चा करायची हौस आहे का? आज त्याला असा प्रश्न विचारतो कि त्याने परत चर्चा बंद केली पाहीजे.
        मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर देवू शकतो का? तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
         मी विचारले कि माणुुस मेहनत करतो मग त्याला यश मिळाले कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले. मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत?

         मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो. बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.
           त्याने उत्तर दिले, तो म्हणाला मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉजीट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे. लॉकर उघडतानां त्या दोन्ही चाव्या लॉकर ला लावाव्या लागतात तरच तो लॉकर उघडते अन्यथा नाही.बरोबर ना? मी म्हणालो बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाचा काम संबंध?

      तो म्हणाला जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात तश्याच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या. एक मेहनत चावी ती आपल्या पाशी असते तर दुसरी नशीब (दैव) चावी ही त्या परमेश्वरा पाशी असते.
     आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची, जेव्हा परमेश्वर त्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल अन्यथा नाही.
     यशा साठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहे त्या शिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.
मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग व नुसती भक्ती करुन उपयोग नाही.
      यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ति दोन्ही आवश्यक आहे.
👍👍👍👍👍👍
•◆•◆•◆★◆•◆•◆•
१०)* *बालगित*
⛔⛔⛔💐💐💐⛔
या बाळांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

मजा करा रे मजा करा !
आज दिवस तुमचा समजा

स्वस्थ बसे तोचि फसे
नवभूमी दाविन मी
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया !

खळखळ मंजुळ गाति झरे
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे
सुवास पसरे, रसहि गळे
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया !

पंख पाचुचे मोरांना
टिपति पाखरे मोत्यांना
पंख फडकती घोड्यांना
मौज दिसे ही थोड्यांना
चपलगती हरिण किती !
देखावे, देखावे
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
११ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂🌇🌇🌇🌇🌇🌇🌇▂▂▂▂▂
*१२ ]  वर्ग १लि साठी गाणे
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
====••◆◆●★●◆◆◆
➖➖➖➖➖➖
गाणे मुळाक्षरांचे ■
✽≡✽≡≡✽≡✧❃✧≡✽≡≡✽≡✽
कमळातील क  राहिला
ख चा खटारा आम्ही नाही पाहिला
      ग च्या गळ्यात घालायची माळ
      घ च्या घरात रांगते बाळ
च च्या चमच्यामध्ये औषध हे घेऊ
छ ची छत्री घेऊन पावसात जाऊ
      ज च्या जहाजात बसू कधीतरी
     झ च्या झबल्यात दिसेल न मी परी
ट चे टरबूज गोल गोल फिरते
ठ च्या ठशामध्ये शाई कोन भरते
     ड चा डमरू वाजे किती छान
     ढ चे ढग वाटे कापसाचे रान
न च्या नळावर पाणी पिऊ चला
ण चा बाण कसा आभालात गेला
    त च्या हातामध्ये मोठी तलवार
    थ चा मोठा थवा जाई दूर फार
द च्या दरवाजात आहे कोण उभा
ध च्या धरणात पाणी किती बघा
     प चा पतंग ऊंच ऊंच फिरे
     फ च्या फणसात गोड गोड गरे
ब च्या बगळ्याची ऊंच ऊंच मान
भ चे भडंग लागते छान
      म म मगर ही पाण्यातच राही
      य यमक कवितेत येई
र च्या रथाला चार चार घोडे
ल चे लसून भाजीत टाकू थोडे
      व च्या वजनाचे आकारच वेगळे
       श चे शहाम्रुग मोठे मोठे बगळे
ष च्या षटकोनाला बाजू कोन सहा
स च्या सशाचे मोठे कान पहा
       ह चे हरिण चाले तुरू तुरू
      ळ च्या बाळाला नका कोणी मारू
क्ष चा क्षत्रिय पराक्रमी वीर
ज्ञ चे ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर
       पाठांतर सोपे झाले मुळाक्षरांचे
       चला रे गाऊ या हे गाणे अक्षरांचे
➖⚛♈✡💐🏵
*१३ )महाराष्ट्र"बाबत  माहिति
📶📶📶📶📶📶📶
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामपंचायतीला जन सुविधांसाठी विशेष अनुदान याबाबत
योजनेचा उद्देश  : ग्रामीण भागात दहन / दफन भूमीची व्यवस्था करणे , त्या सुस्थितीत ठेवणे व त्याचे नियमन करणे
योजनेमध्ये घेता येणारी कामे : दहन / दफन भूसंपादन , चबुतर्‍याचे बांधकाम , शेडचे बांधकाम , पोहोच रस्ता , गरजेनुसार कुंपण वा भिंती घालून जागेची सुरक्षितता साधणे .
दहन / दफन भूमीत विद्युमीकरण व आवश्यकतेनुसार विद्युमदाहीनी / सुधारीत शवदाहीनी व्यवस्था . पाण्याची सोय , स्मृती उद्यान , स्मशान घाट / नदीघाट बांधकाम ( स्मशान व्यवस्थेसाठी आवश्यक तेवढे ) , जमीन सपाटीकरण व तळफरशी .

( ब ) ग्रामपंचायत भवन / कार्यालय याबाबत हाती घ्यावयाची कामे

नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम व इमारती अंतर्गत सुविधा जुन्या ग्रामपंचायत इमारतीची पुनर्बांधणी / विस्तार

ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये वृक्षारोपण , परिसर सुधारणा , परीसराला कुंपन घालणे व इतर अनुषंगीक कामे

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे : (अ) दहन / दफन भूमीवरील कामांबाबत , (ब ) ग्रामपंचायत भवन / कार्यालय बांधकामाबाबत

मिळणारे अनुदान :-

सदर योजना जिल्हास्तरीय योजना असून , जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत निधीची तरतूद करण्यात येईल .

सदर योजनेमध्ये निधी मंजूर करताना गावाची लोकसंख्या विचारात घेण्यात यावी , तसेच एका गावाकरिता ( अ ) व ( ब ) या योजनेसाठी प्रत्येकी जास्तीत जास्त रुपये 10 लाख मंजूर करता येतील .

शासनाने मंजूर केलेला निधी योजनेतंर्गत सुविधा पुर्ण करण्यास कमी पडल्यास ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून त्याची तरतूद करावी . तसेच सदरची कामे संबधित आर्थिक वर्षात पुर्ण करण्यात यावीत .
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१४ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
⛔⛔⛔⛔⛔⛔महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या महान नेत्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!
भारतीय स्वातंत्र्यलढयातील अग्रणी नेते....
      मोहनदास करमचंद गांधी   
        गांधी जयंती हा महात्मा गांधी जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. गांधी जयंती हा भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस "जागतिक अहिंसा दिन" म्हणून स्वीकारला आहे.

🔸जन्म:~  २ ऑक्टोबर १८६९, पोरबंदर, काठियावाड, भारत
🔹मृत्यू: ~ ३० जानेवारी १९४८.नवी दिल्ली, भारत
🔸प्रमुख स्मारक:~  राजघाट
🔹प्रभाव:~ लिओ टॉलस्टॉय, जॉन रस्किन, गोपाळ कृष्ण गोखले
🔸पत्नी नाव:~  कस्तुरबा गांधी

                     *मोहनदास* *करमचंद* *गांधी*   
           ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    🔶हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते
─┅━━▣▣▣━━┅─┄🎗🎗🎗🎗🎗🎗🎗
१५) *व्यक्तिमत्व* *विकास*🎗🎗🎗🎗🎗🎗
➖➖➖➖➖➖
घरापासून प्रारंभ करा:-

आपले संभाषण आपल्या घराशी का सुरू करत नाही? घरातल्या लोकांकडून उत्तेजन मिळवून कुटुंबात मोठ्या प्रमाणात आनंद वाढतो.

अशा संभाषणांसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकमेकांबद्दल खरी चिंता व्यक्त करणे. आपण ज्या गोष्टींची काळजी घेतो त्याबद्दल आम्ही बोलतो, आणि जेव्हा त्याला काही बोलू इच्छित असते, तेव्हा आम्ही त्याचे काळजीपूर्वक ऐकले आहे याव्यतिरिक्त, आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण अशा विषयांवर काहीतरी बोलू जे श्रोत्यांना फायदा होईल.आपण जर नियमितपणे बायबलचा अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास केला, तर याबद्दल बोलण्यासाठी आपल्याला काही विषय नसतील. या पुस्तिकाचा वापर करून दैनंदिन बायबलमधील वचनांचा विचार करून आपण संभाषण सुरू करू शकतो.त्या दिवशी आपण घरोघरच्या प्रचार कार्यात एक चांगला अनुभव घेतला असेल. किंवा आम्ही एखाद्या पुस्तकात काहीतरी मजा किंवा नवीन वाचले आहे? आपल्या कुटुंबासह अशा चांगल्या विषयांवर चर्चा करण्याची सवय आपण करायला हवी. मग आपण कुटुंबाबाहेरील इतरांशीही बोलू शकाल.
🎆🎆🎆🎆🎆🎆🎇
१६) *पाढा* *२१* *चा*
🎄🎄🎄🎄🎄🎄
21, 42,63,84 ,105, 126, 147, 168,  189 210
✴✴✴✴✴✴✴✴✴🌴✴
        *विनम्र अभिवादन..!!*
  🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*संकलन*
*बालचंद चौधरी*
*प्रा*पदविधर*
*के*प्रा*शा*डवाळा*
*वैजापुर*
*.9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●• *१)संजय*गायकवाड* *वैजापुर*ISO* *मु अ*
२) *डोईफोडे* *सर *  बुलढाना*
३)  *वाळुंज* *सर* *व* *आत्रम* **सर*
४) *ता* *कां* *कदम*
५)  *विलास* *शिरोले*, ६). *vaibhav* *Cheke*
🙏🙏🙏🙏🙏🙏🌅🙏
*✧
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ बुधवार   22/11/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ BVC  VAIJAPUR ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment