परीपाठ
➖➖➖➖➖➖
दि-१९/११/२०१८
:1⃣9⃣/1⃣1⃣/2⃣0⃣1⃣8⃣
वार.:- शनिवार
संकलन : बालचंद चौधरी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌄आजचे पंचाग✴
19/11/2018
नागरिक दिन
महिना : कार्तिक, तिथी : शु. एकदशी
, नक्षत्र : उत्तरा भाद्रपदा
योग : वज्र, करण : बव
सूर्योदय: ६.५० सूर्यास्त: १७.५८
प्रबोधिनी एकादशी
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
🌠आजचे सुभाषित📚
कौर्मं संकोचमास्थाय प्रहारानपि मर्षयेत् |
प्राप्ते काले च मतिमानुत्तिष्ठेत् कृष्णसर्पवत् ||
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
मराठि अर्थ
⛔⛔⛔
(कठिण प्रसंगात ) कासावाप्रमाणे पाठीचे कातडे घट्ट करून दणके सुद्धा खावे. पण योग्य वेळ येताच सापा प्रमाणे फना काढावा
🐛🐛🐛🐛🐛🐛
⚛आजचि प्रार्थना🏵
🙏प्रा 🙏र्थ🙏ना🙏🙏🙏
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
🙏प्रा🙏र्थ 🙏ना🙏
⛔⛔⛔⛔⛔⛔
☸आजचा अनमोल सुविचार⛔
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
➖➖➖➖➖➖➖♣♣♣♣♣♣♠
✴आजचि म्हण🈸
😀😀😀😀😀😀
नव्याचे नऊ दिवस –
★ अर्थ ::~ नवेपणा
कौतुक नंतर टिकत नही.
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄⚛बालचंद चौधरी वैजापुर☸
9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
➡➡➡➡➡➡➡
☮बालगित. ⛔
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
किलबिल किलबिल पक्षि बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुलें बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्नीं आले काही, एक मी गाव पाहिला बाई !
त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे, कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती, गाति नाचती, कोणी रडके नाही
नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो, पडो, धडपडो, लागत कोणा नाही
तिथल्या वेली गाणी गाती, पर्या हासर्या येती जाती
झाडांवरती चेंडु लटकती, शेतांमधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही
🦆 बा🦅ल🦉गि🦇त🐛🦋🐝🦗
➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖
💢 बो📜ध📄क📰था *आठवणउपदेशाची*
🌲🌲🌲🌲🌲🌲BVC
एकदा काही पाखरे एका घुबडाला म्हणाली, 'तू आपलं घर पडक्या भिंती किंवा जुन्या झाडाच्या ढोलीत का बांधतोस? त्यापेक्षा हिरव्यागार झाडांवर बांधलंस तर किती चांगलं होईल !'
त्यावर घुबड म्हणाले, 'अरे वेड्यांनो, पक्षी धरण्याकरता झाडांवर चिकटा लावतात. तेव्हा अशा झाडावर राहाण्यापेक्षा एखाद्या सुरक्षित जागी राहाणं हे अधिक योग्य नाही का ? आता इथे सुख कमी आहे ही गोष्ट खरी, पण इथे भीती नाही.'
पण त्या घुबडाचे म्हणणे त्या पाखरांना रुचले नाही. ती बाहेर एका झाडावर उड्या मारत राहिली. थोड्या दिवसांनी एका पारध्याने तेथील झाडावर जागोजागी चिकटा लावला. त्यात ती पाखरे सापडली. पारध्याने त्यांना धरले तेव्हा त्यांना घुबडाच्या उपदेशाची आठवण झाली. आपण त्याचे ऐकले नाही याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.
🌀तात्पर्य_ ❄::~*
कोणी चांगले सांगितले तर त्यांचे ऐकून विचार करून कृती करावी. नाहीतर नंतर पश्चात्ताप होतो.
बो 📕ध📕क📕थ📕
➖➖➖➖➖➖➖
⚛दे🈸श☸भ✡क्ति✴गि☮त
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझ पे दिल कुरबान
तू ही मेरी आरजू़, तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए
उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस जुबाँ को
जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी
सबसे रंगी तेरी शाम
तुझ पे दिल कुरबान
माँ का दिल बनके कभी
सीने से लग जाता है तू
और कभी नन्हीं-सी बेटी
बन के याद आता है तू
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझ पे दिल कुरबान
छोड़ कर तेरी ज़मीं को
दूर आ पहुँचे हैं हम
फिर भी है ये ही तमन्ना
तेरे ज़र्रों की कसम
हम जहाँ पैदा हुए उस
जगह पे ही निकले दम
तुझ पे दिल कुरबान
⛔दे⛔श⛔भ⛔क्ति⛔गी⛔त⛔
➖➖➖➖➖➖➖➖बालचंद चौधरी➖➖
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
➿समुहगित ➿
🏵स🏵मु🏵ह🏵गि🏵त🏵
धनी आपुन राव या देशाचं
हा देश अपुला धर्म अपुला देश॥धृ॥
लहान परमानं मोठं सारं इथं जन्मलं भाग्यानं
काळि सावळी जमीन आई घास भरविते प्रेमानं
हे देणं खरोखर देवाचं॥१॥
पैशानं जरि गरीब झालो मनात आमुच्या शिरीमंती
जिवभाव या धर्मावरती देशावरती लइ प्रीती
हे ब्रीद आपुलं हिंदुचं॥२॥
सोडुन घरची लक्ष्मी आणिक मुलं लेकरं आवडीची
देशासाठी मरुन जावं सांगी आपुल्या धर्माची
हे जिणं आपुलं विरांच॥३॥
देश इकाया निघल त्याची नकोच आम्हा जिनगानी
कम अस्सल ते अवलादीचं थुकावं त्यावर समद्यांनी
हे इमान अपुल्या झेंड्याचं॥४॥
हिंदू तितुका सगासोयरा हिरा पृथ्वीविच्या मोलाचा
देश धर्म हा एक जयाचा आपुल्याच तो रक्ताचा
हे आपुन आपुल्या जीवाचं॥५॥
📘स📘मु📘ह📘गि📘📘त📘
आजचे थोरव्यक्ति
⛔⛔⛔⛔⛔⛔➖⛔➖➖➖➖➖➖
पूर्ण नाव~ विवेकानंद
नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त
जन्म~ १२ जानेवारी १८६३
कोलकाता, पश्चिम बंगाल
मृत्यू~ ४ जुलै १९०२
बेलूर, कोलकाता, भारत
वडील~ विश्वनाथ दत्त
आई~ भुवनेश्वरी नंदलालजी बसु
गुरु ~ रामकृष्ण परमहंस
◆ *स्वामी विवेकानंद*◆
हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त (नरेंद्र, नरेन) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते.
विवेकानंदांचा जन्म झाला तो दिवस योगा योगाने मकर संक्रती चा होता .बाळाचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. किशोरावस्थे पासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इ. छंद होते.
*◆विवेकानंद नामकरण◆*
राजा अजितसिंग खेत्री यांनी दि. १० मे १८९३ या दिवशी स्वामीजींना *'विवेकानंद'* असे नाव दिले.
*●शिकागो, अमेरिका येथील सर्वधर्मपरिषद●*
सर्वधर्मपरिषदेतील विवेकानंद
११सप्टेंबर १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरातिल शिकागो - आर्ट इन्स्टिट्युट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. सुरुवातीस थोडे नर्व्हस असूनदेखील त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सात सहस्र जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता."जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यूयॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड ।आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.
कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक उभे आहे
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
आजचा पाढा 19
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
19, 38, 57, 76. 95 114, 133. 152 171 190
🛣आ🛣ज🛣 चा 🛣🛣पा 🛣 ढा🛣
देशभक्ति चारोळि
➖➖➖➖➖➖
🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
राष्ट्रासाठी इथे लाखदा इर्षा बलिदानाची...
अजून वाळली नाहीत पाने अमुच्या इतिहासाची
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
🔻आजचे ईग्रजि शब्द🔻
➖➖➖➖➖➖
1⃣fashion-: पद्धत, चाल
2⃣seeded:- विशिष्ट प्रकारचे बी किंवा बीया असलेले
3⃣ Laches :- कसेतरी फाडणे
4⃣Engrain :- खोल रूजवणे
⛔⛔B⛔V⛔ C⛔
No comments:
Post a Comment