Wednesday, December 12, 2018

13/12/2018 चा परीपाठ

🌏 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐
🌹परीपाठ*🌹
❂ दिनांक:~    13/ 12/2018
  *वार :-  गुरुवार----
➿➿➿➿➿➿➿
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
* बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
सौजन्य - नितीन केवटे, समूह प्रमुख
भालचंद्र भोळे, मुख्य प्रशासक
..•●◆●★TSS★●◆●•═
अधिक अपडेट साठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या
http://tssmaha.blogspot.com/?m=1
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽💥🇮🇳 *राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 
💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
‌01 ]   ❂ आजचे पंजाग
⛲⛲⛲⛲🈳🈳🈳
    माल्टा : प्रजासत्ताक दिन
महिना : मार्गशीर्ष, तिथी : शु.षष्ठी, नक्षत्र : धनिष्ठा
योग : हर्षण, करण : कौलव
सूर्योदय: ७.०५ सूर्यास्त: १८.०१
चंपाषष्ठी,स्कंदषष्ठी
━━═•●◆❃★❂★❃◆●
‌0२ ]   सुविचार 
💒💒💒💒💒💒💒
18. *एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.  /
📖📖📖📖
( 3)म्हण वत्याचा अर्थ
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर –
  ★ अर्थ ::~ दोनपैकी एक पर्याय निवडणे
🔶➖➖➖➖➖🔺
(४)❂ प्रार्थना❂
➿➿➿➿➿➿➿
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना
चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आता
➖➖➖➖➖➖➖
*05 ] 💠 सुभाषीत💠💠
====••◆◆●★●◆◆◆••
  दुर्जनः परिहर्तव्यः*
    *विद्ययाऽलंकृतोऽपि सन्
  ⭐अर्थ :: ~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*06)♦दिनविशेष*♦
 ★★==
🈳13. डिसेंबर ★🈳
====●●●★●●●====
★ नागरी संरक्षण दिन
★ हा या वर्षातील ३४७ वा (लीप वर्षातील ३४८ वा) दिवस आहे.
★ माल्टाचा प्रजासत्ताक दिन
💠💠 महत्त्वाच्या घटना
  ●२००१ : जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या अतिरेक्यांनी संसदभवनावर हल्ला केला.
●१९९१ : मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९४१ : दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
●१९३० : ’प्रभात’चा ’उदयकाल’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव ’स्वराज्याचे तोरण’ असे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.

        जन्मदिवस / जयंती★*~
 ⏺⏺🔆🔆🔆🔅🔅🔅
◆१९५५ : मनोहर पर्रीकर – गोव्याचे मुख्यमंत्री
◆१८९९ : पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक🔺
◆१८०४ : मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ, मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली, इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.
◆१७८० : योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
⏺⏺⏺⏺⏺⏺⏺                   
●१९९६ : श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार,
●१९९४ : विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक,(जन्म: १७ आक्टोबर १९१७ - कोडोवली, पन्हाळा, कोल्हापूर)
●१९८६ : स्मिता पाटील – अभिनेत्री.  पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड
●१९६१ : अ‍ॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ’ग्रँडमा मोझेस’ यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी पेंटिंगच्या छंदाची सुरूवात केली आणि त्यात प्रसिद्धी मिळवली.
●१९३० : फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ
●१७८४ : सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
( 7)समुहगित*
➖➖
भगवंताचे जया लाभले। चिर विजयी वरदान।
संघा वाचुन कोण स्विकारिल। काळाचे आव्हान॥धृ॥

परंपरचे पौरुषाचे।पराक्रमी पुरुषांचे।
पुनीत पावन घडते येथे।पुजन वसुंधरेचे।
मांगल्याचे पावित्र्याचे। राष्ट्रीय चारित्र्याचे।
संघशक्तिने चरित्र घडते। बाल-तरुण-प्रौढाचे।
इथेच मिळतो मायभूमिला। अग्रपुजेचा मान॥१॥

पुण्यपुरातन इथे सनातन।ध्वज भगवा आमुचा
ग्राम नगर गिरिकंदरि डोले। जगी दिग्विजयाचा।
विश्वगुरुपदी सदा नांदला।विजयी जगताचा।
नानक गुरुचा महाराणाचा। विक्रमी शिवबाचा।
नील अंबरी फडकत असता। चढे नवे अवसान॥२॥

काल्पनीक प्रांतांच्या सीमा।भेद इथे ते सरले।
जाति-पंथ-भाषेचे अंकुर।कधी न इथे रुजले।
भिन्नत्वातुन अभिन्नतेचे।विशाल मंदिर उठले।
अंजिक्य-अविचल मंदिरात या।केशवदर्शन घडले।
कोटि कोटि हृदयांत चिरंतन। कार्याचा अभिमान॥३॥
➖➖➖➖➖➖➖
08]बोधकथा*
❃. *❃ कोकिळा,पोपट व घार ❃*
 ━━═•●◆●★◆★●◆●
*एका गरीब भोळ्या कोकीळाला* एका घारीचे मरणप्राय भय वाटले. कारण घार तिच्या डोक्यावर ओरडत व भक्ष्यासाठी घिरट्या घालत फिरत होती.
            ते पाहून एक पोपट कोकीळाला म्हणाला की, 'इकडे ये, घाबरू नको, धीर धर. हा सर्व किलकिलाट व धडपड केवळ मूर्खपणाची आहे. शेवटी या आळशी घारीने एखादा गरीब बेडूक किंवा उंदीर पकडलेला तू पाहशील, अरे ससाणे हे खरे भयंकर पक्षी असून ते काही गडबड न करता मुकाट्याने प्राणी पकडून खातात.'
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  बोलेल तो करेल काय ? गर्जेल तो पडेल काय
➖➖➖➖➖➖
9)* *बालगित*
➡➡➡➡➡➡➡➡
10 ]  देशभक्ति गीत
🗑🗑🗑🗑🗑🗑🗑*✸ अमुचा भारत देश महान ✸*
   ●●●●००००००●●●●●
परदास्याची तुटे शृंखला सरला अंध:कार
नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार
स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान
अमुचा भारत देश महान !
स्वराज्य येथे सुराज्य व्हावे
रामराज्य या भूवर यावे
त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान
अमुचा भारत देश महान !
या देशाला शिकवून भक्ती
गांधिजींनी केली मुक्ती
राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान
अमुचा भारत देश महान !
गरीब कोणी, अमीर कोणी
या मातीला समान दोन्ही
माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान
अमुचा भारत देश महान
=================
‌11] थोरपुरुष माहिती
*❒ ♦वसंतराव नाईक♦
━━═•●◆●★◆★●◆
★महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री★
               व एक कृषितज्ञ.
_*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
 🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏●जन्म :~ १ जुलै १९१३
गहुली ता.पुसद जिल्हा यवतमाळ
*●मृत्यू :~ १८ ऑगस्ट १९७९*

       ◆वसंतराव फुलसिंग नाईक◆
    मानवता, न्याय व समतेसाठी झुंज देणारे जे महामानव झाले, त्यात वसंतराव नाईक यांचे अगक्रमाने आहे. हरितक्रांतीचे शिल्पकार महानायक महाराष्टाचे माझी मुख्यमंञी हरित क्रांतिचे प्रणेते, कुळ कायदयाचे जनक, महाराष्टृातील विज प्रकल्पाची निर्मिती करनारे, धरनाची निर्मिती करणारे, रोजगार हमी योजनेचे जनक, शेतकरी कारखानदार झाला पाहीजे असे स्वप्न पाहनारे, कापुस एकाधिकार योजनेचे जनक वंसतराव नाईक साहेब....
पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). पुढे १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी सु. १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.
प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य केले. १९७७ मार्चमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.

     समाज जागृतीचा पहिला अध्याय त्यांनी समाजाला दिला. त्यांचे हे विचार बंजारा समजापुरते मर्यादित न राहता प्रत्येक जाती, धर्म, विविध समाजात पोहचले आणि प्रत्येक ठिकाणी एक माणुस म्हणून पुढं यावे, हीच त्यांची इच्छा होती. दि. 18 ऑगस्ट 1979 रोजी वसंतराव नाईक व सौ. वत्सला नाईक या उभयंतांनी सिंगापूर यात्रा करत असताना वसंतराव नाईक यांचे 66 व्या वर्षी निधन झाले
🎆🎆🎆🎍🎍🎆
  14]  ❂ सामान्य ज्ञान ⚫
━┅━═▣◆★✧★◆▣═
✿ जिवनसत्व सर्व माहिती
   *जिवनसत्व ➜ ब1*
●शास्त्रीय नांव   ➜ थायमिन 
●उपयोग  ➜ चेतासंस्थेचे आरोग्य
●अभावी होणारे आजार  ➜ बेरीबेरी
●स्त्रोत    ➜ धन्य, यीस्ट, यकृत,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🎌🎌🎌🎌🎌🎌🎌
16)💠प्रेरणादायक विचार
जीवनात मागे बघाल तर,*
 *अनुभव मिळेल..*
 *जीवनात पुढे बघाल तर,*
       *आशा मिळेल..…*
 *इकडे -तिकडे बघाल तर,*
       *सत्य मिळेल...*
 *आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,*
        *आत्मविश्वास मिळेल...!
█║▌║▌║█❃❂❃█║▌
गुरुवार
     13/12/2018
🌐 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐
🌀🎯 धरुनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची 🎯🌀
❄❄❄❄❄❄❄
🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
समाप्त
➖➖➖➖

No comments:

Post a Comment