Tuesday, December 11, 2018

12/12/2018 चा परीपाठ

🌏 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐

🌹परीपाठ*

❂ दिनांक:~12/ 12/2018


🔘 *वार :-   बुधवार----🔘

➿➿➿➿➿

संकलन*

⛔⛔⛔⛔⛔⛔

🌅 * बालचंद चौधरी* वैजापुर

केंद्रीय प्रा शाळा डवाळ

⛔⛔⛔⛔⛔⛔⛔     9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣

सौजन्य - नितीन केवटे, समूह प्रमुख

भालचंद्र भोळे, मुख्य प्रशासक

..•●◆●★TSS★●◆●•═━━


अधिक अपडेट साठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या

दररोजचा परीपाठ मिळवा

⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*💥🇮🇳 *राष्ट्रगीत  🇮🇳💥*

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*➖➖➖➖➖➖➖


‌1)  आजचे पंचाग
➡➡➡➡➡➡➡➡➡
स्वदेशी दिन
महिना : मार्गशीर्ष, तिथी : शु.पंचमी, नक्षत्र : श्रवण
योग : व्याघात, करण : बव
सूर्योदय: ७.०४ सूर्यास्त: १८.००➿➿➿➿➿➿➿➿
2) सुभाषित
➖➖➖➖➖➖➖➖➖
परस्परविरोधे तु वयं पञ्च च ते शतम् |
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् | ⏪⏪⏪⏪⏪⏪⏪⏪⏪
  ━━═●✶✹★●★✹✶●═━━
३)प्रार्थना
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
.  *सूर्यनारायणा नित्‌ नेमाने*
       ==••◆◆●★●◆◆••==
सूर्यनारायणा नित्‌ नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा
ओंजळीनं भरू दे गा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सावली मायेची
आबादानी होवो शेत भरू दे दाण्याचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे
➖➖➰➿➿➖➖➖➖
4)सुविचार
👉👉👉👉👉👉👉👉👉
जोपर्यंत कोणी एखाद्या मोठ्या ध्येयाला प्राप्त नाही करत, तोपर्यंत ते मोठे ध्येय नेहमी असंभव वाटत असते.
- नेल्सन मंडेला
🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼
5)आजची म्हण व अर्थ
***********************
 सुखा मेवा ज्यांचे घरी,
प्रथिने तेथे वास करी.. .🍱
▶▶▶▶▶▶▶▶▶▶▶▶
6)दिनविशेष
‌🔻🔻🔻🔻🔻
🛡 ★ 12. डिसेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ स्वदेशी दिन
★ हा या वर्षातील ३४६ वा (लीप वर्षातील ३४७ वा) दिवस आहे.🔊
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
    🎧🎧🎧🎧🎷🎷🎷🎧
●२००१ : आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
●१९११ : दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
●१९०१ : जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
●१७५५ : डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन
~*★जन्मदिवस / जयंती★*~
         🎶 🎶🎶🎶🎶🎶🎶
◆१९८१ : युवराजसिंग – भारतीय क्रिकेटपटू
◆१९५० : रजनीकांत – प्रसिद्ध तामिळ अभिनेते
◆१९४० : शरद पवार – केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
◆१८९२ : गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे.
◆१८७२ : डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिन्दू महासभेचेसंस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि नाशिक येथील ’भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक
 ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
   🔌🔌🔌🔌🔌🔌🔌           ●२०१२ : पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्‍न’
१९९२ : पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक
●१९९१ : दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर – शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष
●१९६४ : मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)
●१९३० : परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू 
🔻====●●●★●●●====🔻
  7)बोधकथा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

गुलाब पुष्प 🔶

 ••◆•◆•◆★◆•◆•◆••

 एक राजकन्या होती. एकदा राजवाड्यात एक ऋषी आलेले असताना तिने त्यांचा अपमान केला. त्यावेळेस क्रोधित झालेल्या त्या तपस्वी ऋषींनी तिला शाप दिला की, " दिवसभर तू गुलाब पुष्प होऊन राजवाड्याच्या समोरच्या बागेत गुलाबाच्या ताटव्यात राहशील. पण संध्याकाळ होताच राजकन्येच्या रुपात येऊन राजवाड्यात येऊन झोपू शकशिल. मात्र सकाळ होताच त्या गुलाब ताटव्यातील एक गुलाब होशील." हा शाप ऐकून तिने चुकीबद्दल ऋषीची क्षमा मागितली. ऋषींचा राग शांत झाल्यावर त्यांनी उपशाप दिला की, "जो कोणी ताटव्यातील गुलाबातून तुझा गुलाब ओळखून खुडेल, त्यावेळेस तुझी मुक्तता होईल." या उपशापाप्रमाणे राजाने अनेकांना आवाहन केले. पण कोणालाच गुलाब ओळखता येईना ! एक दिवस कौसर देशाचा राजकुमार आला. त्याने राजकन्येचा गुलाब ओळखून तो अलगद खुडला. त्याक्षणी राजकन्या शापमुक्त झाली.  " हा गुलाब तू कसा ओळखलास? असे राजाने विचारताच राजपुत्र म्हणाला, " महाराज, सोपं होत. रात्रभर राजकन्या महालात असते. व सूर्योदयानंतर गुलाबच फुल होते. तेव्हा संपूर्ण गुलाबाच्या ताटव्यातील फुले दवान भिजलेली असतील. पण सूर्योदयानंतर दव पडत नाही, म्हणजे राजकन्येच फुल कोरड असणार ! असा विचार करून मी योग्य ते फूलं तोडलं." राजा त्याच्या होशारीवर खुश झाला.


 *_🌀तात्पर्य_ ::~*


 सारासार विचार करून निर्णय घेतल्यास तो योग्य ठरतो.


▂   

 

⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩


8)देशभक्ति गीत

🎙🎙🎙🎙🎙🎙🎙🎙


. *✸अमुचा भारत देश महान..!*अमुचा भारत देश महान


परदास्याची तुटे शृंखला सरला अंध:कार


नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार


स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान


अमुचा भारत देश महान !


स्वराज्य येथे सुराज्य व्हावे


रामराज्य या भूवर यावे


त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान


अमुचा भारत देश महान !


या देशाला शिकवून भक्ती


गांधिजींनी केली मुक्ती


राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान


अमुचा भारत देश महान !


गरीब कोणी, अमीर कोणी


या मातीला समान दोन्ही


माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान


अमुचा भारत देश महान


➖➖➖➖➖➖➖➖➖
9) बालगित
🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?
भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

▶▶▶▶▶▶▶▶▶▶▶
10)समुहगित
🏝🏝🏝🏝🏝🏠🏝🏝🏠
आम्हि हिंदू राष्ट्र सनातन संघटना हे अमुचे जीवन॥धृ॥
नर वानर एकत्र गुंफुनी संघटनेची विशाल काया
बुध्दीमंत हनुमंत उभारी दास्यमुक्तिचा भरुनी पाया
उल्लंघुनिया संकटसागर मर्दन केला ससैन्य रावण॥१॥
संप्रदाय मतभेद माजले पाखंडाचा उधळे वारु
अद्वैताचा शंख फुंकुनी पुजी पंचायतन जगद् गुरु
विविधतेत एकता दाखवी आचार्यांचे अद्भुत दर्शन॥२॥
थोर महंतांकरवी केली सहस्त्रावधी मठस्थापना
रामकथा ब्रम्हांड भेदुनी घुमवित होती दाहि दिशांना
समर्थ शिवशक्तिने नांदवी निर्भय स्त्री मंदिर गो ब्राम्हण॥३॥
मरगळलेल्या राष्ट्रामधली होता जागृत अमर चेतना
सप्तसिंधु ओलांडुन गेली हिंदुत्त्वाची सिंहगर्जना
दिली विवेकानंदे शिकवण समाजसेवा हे प्रभुपूजन॥४॥
संघटनेस्तव संघटनेची अमृतविद्या सांप्रतकाळी
राष्ट्राचे संजीवन करण्या केशवरुपे जणु अवतरली
लक्षलक्ष तरुणांत स्फुरतसे सर्वस्वाचे सहज समर्पण॥५॥
⏩⏩⏩⏩⏩◾◾◾◾
(11)थोरपुरुष माहिती

गोपाळ कृष्ण गोखले


नामदार गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ - फेब्रुवारी १९, १९१५) हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारत सेवक समाज या संघटनांचे ते आघाडीचे नेते होते.


♈♈♈♈♈♈♈♈


‌12)देशभक्ति चारोळि  ➖➖➖

लहरोंसे डरकर नौका पार नहीहोती ,


कोशीश करनेवालोंकी कभी हार नही होती


➖➖➖➖➖➖➖➖


  13)◾१२ चाआजचा पाढा


⏺⏺⏺⏺⏺⏺⏺⏺⏺


१२,२४,३६,४८,६०,७२,८४,९६,१०८,१२०


◾◾◾◾◾◾◾◾


१4)  इंग्रजी  शब्द
◾◾◾◾◾◾◾◾
१)  Lohan - लोहान
२) LSsue - बाहेर पडण्याचि
३) subhead - उपविभागाचा मथळा

‌‌🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


15)🌀 सामान्य ज्ञाण🌀


🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

01. *नाशिक विभाग अभयारण्ये*


      ●☆●☆●☆●☆●☆●☆●


● रेहेकुरी अभयारण्य


        ~ अहमदनगर.


● माळढोक पक्षी अभयारण्य


         ~ सोलापुर & अहमदनगर.


● कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य


          ~ अहमदनगर


● यावल अभयारण्य ~ जळगांव


● अनेर धरण अभयारण्य ~ नंदुरबार


┅━═▣◆★ BVC 9545238102
✧★◆▣═━┅━
‌16)🌀 अनमोल विचार

अळीला जेव्हा वाटते की आता आयुष्य संपलंय, तेव्हा तिचे रुपांतर एका सुंदर फुलपाखरू मध्द्ये होते


█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║


   बुधवार


🏖🏖🏖🏖🏖🏖


    12/12/2018 ◆*


🌐 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐


🌀🎯 धरुनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची 🎯🌀


❄❄❄❄❄❄❄❄


🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा



⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳


समाप्त


➖➖➖➖


No comments:

Post a Comment