Monday, December 10, 2018

11/12/2018 चा परीपाठ

🌏 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐


🌹परीपाठ*🌹


❂ दिनांक:~    11/ 12/2018


🔘 *वार :-  सोमवार----🔘


➿➿➿➿➿➿➿➿


*संकलन* (एकुन मुद्दे 1 ते17)


⛔⛔⛔⛔⛔⛔


🌅 * बालचंद चौधरी* वैजापुर


केंद्रीय प्रा शाळा डवाळा


   ⛔⛔⛔⛔⛔⛔⛔     9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣


सौजन्य - नितीन केवटे, समूह प्रमुख


भालचंद्र भोळे, मुख्य प्रशासक


..•●◆●★TSS★●◆●•═━━


अधिक अपडेट साठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या



⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*💥🇮🇳 *राष्ट्रगीत  🇮🇳💥*


❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*


❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*


➖➖➖➖➖➖➖


‌1)  आजचे पंचाग
➡➡➡➡➡➡➡➡➡
मंगळवार, मिती शके १९३७
महिना : मार्गशीर्ष, तिथी : शु.चतुर्थी, नक्षत्र : उत्तराषाढा
योग : ध्रुव, करण : बव
सूर्योदय: ७.०३ सूर्यास्त: १८.००
विनायक चतुर्दशी
➿➿➿➿➿➿➿➿
2) सुभाषित
➖➖➖➖➖➖➖➖➖
पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासा |
तथापि तत्तूल्यकवेरभावादनामिका सार्थवती बभूव
⏪⏪⏪⏪⏪⏪⏪⏪⏪
  ━━═●✶✹★●★✹✶●═━━
‌  ३)प्रार्थना
जय शारदे वागीश्वरी
विधिकन्यके विद्याधरी

ज्योत्‍स्‍नेपरी कांती तुझी, मुख रम्य शारद चंद्रमा
उजळे तुझ्या हास्यांतुनी चारी युगांची पौर्णिमा
तुझिया कृपेचे चांदणे नित्‌ वर्षु दे अमुच्या शिरी
वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली
संगीत जन्मा ये नवे, जडता मतिची भंगली
उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी
➖➖➰➿➿➖➖➖➖
4)सुविचार
आपण जे पेरतो तेच उगवतं
🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼
5)आजची म्हण व अर्थ
***********************
अति शहाणा त्याचा बैल रिकामा–
   ★ अर्थ ::~ अति शहाणपणाने नुकसान होते
▶▶▶▶▶▶▶▶▶▶▶▶
6)दिनविशेष
‌🔻🔻🔻🔻🔻🔻★ 11. डिसेंबर ★

 🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३४५ वा (लीप वर्षातील ३४६ वा) दिवस आहे.

                    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१ : चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश
●१९७२ : अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
●१९६७ : कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
●१९४६ : युनिसेफ (UNICEF) ची स्थापना
●१९३० : सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक

   ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                 
◆१९६९ :  विश्वनाथन आनंद – भारतीय ग्रँडमास्टर व विश्वविजेता
◆१९४२ : आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार
◆१९२५ : राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार
◆१९२२ : मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल
◆१९१५ : मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक
१९०९ : नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते 
●१८९९ : पु. य. देशपांडे – कादंबरीकार व तत्त्वचिंतक
◆१८४३ : रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर

        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
               
●२००४ : एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका
●२००२ : नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ
●२००१ : रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
●१९९८ : रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५
◾◾◾◾◾◾◾◾◾
  7)बोधकथा
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
  *❃ अस्‍सल नकलाकार ❃* 
 एका गावात एका नकलाकाराचे दररोज कुठे ना कुठे कार्यक्रम होत असत. त्‍याचे उंची कपडे, गोड व खुसखुशीत बोलणे व त्‍याने केलेल्‍या विविध नकलांमुळे तो प्रसिद्ध होता. त्‍याच्‍या या आवाज काढण्‍याच्‍या कलेमुळे तो लोकांचा आवडता बनला होता. एका कार्यक्रमामध्‍ये त्‍याने एकदा मांजराच्‍या पिलाचा आवाज काढला.  लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
लोक वाहवा करू लागले त्‍याच वेळी एक घोंगडी घेतलेला एक खेडूत शेतकरी उठून उभा राहिला व
म्‍हणाला,'' या कलाकाराने काढलेल्‍या आवाजापेक्षा मांजराच्‍या पिलाचा आवाज हा वेगळा असतो. या कलाकारासारखा आवाज मांजर कधीच काढत नाही. मी अस्‍सल मांजराच्‍या पिलाचा आवाज काढू शकतो.'' लोक म्‍हणाले,''ठीक आहे, तू आवाज काढून दाखव.'' असे म्‍हणताच घोंगडीवाल्‍याने आपल्‍या डोक्‍यावरून पूर्ण घोंगडी
पांघरली व आतून मांजराच्‍या पिलाचा आवाज काढला. आवाज ऐकून लोक ओरडू लागले,''छे, छे, नाही, नाही, नकलाकाराने काढलेला आवाजच योग्‍य होता. तुला आवाज काढताच येत नाही.
तू चुकीचा आवाज काढतो आहे.'' हे ऐकताच घोंगडीवाला म्‍हणाला,'' मित्रांनो मी तो आवाज मुळी काढलेलाच नाही.'' असे म्‍हणून त्‍याने घोंगडी अंगावरून काढून फेकली व लोक आश्‍चर्यचकित झाले कारण त्‍याने एका हातात मांजरीचे पिलू धरले होते.
     तो पुढे म्‍हणाला,''मला माहित होते की तुम्‍ही लोक मी काढलेल्‍या आवाजाला नकार देणार म्‍हणून मी आवाज न
काढता या मांजरीच्‍या पिलाला दोन चिमटे काढले व त्‍या पिलाने आवाज काढला. तुम्‍ही मला का नाकारले याचे कारण मी या नकलाकारासारखा सजूनढजून न येता, खुसखुशीत न बोलता, बडेजाव न मिरवता साध्‍या वेशात माझे सादरीकरण केले.''
लोकांना आता शेतक-याचे बोलणे लक्षात आले.
" तात्पर्य "
⏸⏸⏸⏸⏸⏸⏸⏸⏸

  चुकीच्‍या गोष्‍टीही अत्‍यंत आकर्षकपणे मांडल्‍या की सहजपणे प्रसिद्ध होतात यातून लोकांची दिशाभुल होते. समाजानेही भपक्‍यापेक्षा सत्‍याची कास धरणे गरजेचे आहे


⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩


8)देशभक्ति गीत

✸ मेरे देश की धरती.. ✸*


●●●●●००००००●●●●


मेरे देश की धरती


सोना उगले उगले हीरे मोती


मेरे देश की धरती
बैलों के गले में जब घुँघरू जीवन का राग सुनाते हैं
ग़म कोस दूर हो जाता है खुशियों के कंवल मुसकाते हैं
सुन के रहट की आवाज़ें यों लगे कहीं शहनाई बजे
आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती
मेरे देश की धरती
जब चलते हैं इस धरती पे हल ममता अँगड़ाइयाँ लेती है
क्यों ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है
इस धरती पे जिसने जनम लिया उसने ही पाया प्यार तेरा
यहाँ अपना पराया कोई नही हैं सब पे माँ उपकार तेरा
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती
मेरे देश की धरती
ये बाग़ हैं गौतम नानक का खिलते हैं अमन के फूल यहाँ
गांधी, सुभाष, टैगोर, तिलक ऐसे हैं चमन के फूल यहाँ
रंग हरा हरिसिंह नलवे से रंग लाल है लाल बहादुर से
रंग बना बसंती भगतसिंह रंग अमन का वीर जवाहर से
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती
मेरे देश की धरती
➖➖➖➖➖➖➖➖➖
9) बालगित
अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका
प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा
ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा
क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई
▶▶▶▶▶▶▶▶▶▶▶
10)समुहगित
गर्जत जयजयकार भूमिचा शत्रू हटवू सीमेपार॥धृ॥
एकमुखाने एकदिलाने मातृभूमिला देऊ साद
दुष्मन भिडला सीमेवरि या उठवू तोफांचा घननाद
शुरविरांच्या तलवारींना आज चढे शौर्याची धार॥१॥
लाख लाख भुजदंड तळपती घुमवित कानन गिरिकंदार
कोटि कोटि नयनांतुन उठतो अपमानचा खदिरांगार
जाळित कापित अरिसेना ना अम्हास ठाउक ती माघार॥२॥
पक्ष पंथ वा प्रांतभेद हे मुळी न ठाउक आज अम्हा
मातृभक्त अम्ही एकच झालो प्राणांची ना अम्हा तमा
पराक्रमाची शर्थ करोनी धवल यशाचे उघडू द्वार॥३॥
रणयज्ञाला अडसर करतिल जर देशद्रोही वेताळ
पिसाळ - जयचंदाचे वारस रिपुरांष्ट्रांचे कुणी दलाल
भरडून काढू निर्दयतेने न ठेवू मातृभूमिला भार॥४॥
शिव बाजीच्या पराक्रमाची इथे नांदली परंपरा
मुरारजीच्या वीर कथांनी धन्य जाहली वसुंधरा
त्या रक्ताची शपथ घेउनी चला पुढे व्हा करा पुकार॥५॥
⏩⏩⏩⏩⏩◾◾◾◾
(11)थोरपुरुष माहिती

. *❒ राकेश शर्मा ❒* 


             ━━═•●◆★◆●•═━━


जन्म :~ १३ जनवरी १९४९, लुधियाना, पंजाब, भारत


पद  :~ स्क्वाड्रन लीडर (विंग कमांडर सेवानिवृत्त), भारतीय वायुसेना

                  अंतरिक्ष मध्ये घालवलेला कालावधी ७ दिवस २१ घंटे ४० मिनिट


 ⚜ हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत.


🔷 भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला तो २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-२ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्माने अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयां साठी खुले केले.


🔶राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो, या प्रश्‍नाला त्यांनी "सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा' असे अभिमानी उत्तर दिले होते.🔷पतियाळात जन्मलेला राकेश भारतीय वायू दलात वैमानिक होता.🔶नंतर च्या काळात त्यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केल्या गेला


♈♈♈♈♈♈♈♈♈112)देशभक्ति चारोळि  ➖➖➖


मुझे ना तन चाहिए, ना धन चाहिए


बस अमन से भरा यह वतन चाहिए

जब तक जिन्दा रहूं, इस मातृ-भूमि के लिए


और जब मरुँ तो तिरंगा कफ़न चाहिये


➖➖➖➖➖➖➖➖


  13)◾११ चाआजचा पाढा ◾


⏺⏺⏺⏺⏺⏺⏺⏺⏺


11,22,33,44,55,66,77,88,99110


◾◾◾◾◾◾◾◾


१4)  इंग्रजी  शब्द
◾◾◾◾◾◾◾◾
१) Rebates :-सुट
२) Home :- घर
३) SISTER:-  बहिण
४) Father  वडिल

‌‌🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


15)🌀 सामान्य ज्ञाण🌀


🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
✿संशोधक व लावलेले शोध✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
▪ अणू भट्टी     ➜  एन्रीको फर्मी
▪ निसर्ग निवडीचा सिद्धांत =    ➜ चार्ल्स डार्विन
▪ अनुवंशिकता सिद्धांत ➜ग्रेगल मेंडेल
▪ पेनिसिलीन   ➜  अलेक्झांडर फ्लेमिंग
▪ इन्शुलीन     ➜  फ्रेडरिक बेंटिंग
▪ पोलिओची लस    ➜ साल्क

━┅━═▣◆★ BVC 9545238102
✧★◆▣═━┅━

16)🌀 अनमोल विचार 🌀


⚫⚫⚫⚫⚫⚫
मनात खुप काही असतं सागण्यांसारख पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु
लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये
मात्र हसावच लागतं...
जीवन हे असच असतं ते आपलं असलं तरी...
     *इतरांसाठी जगावं लागतं...*

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║


  मंगळवार


🏖🏖🏖🏖🏖🏖


    11/12/2018 ◆*


🌐 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐


🌀🎯 धरुनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची 🎯🌀


❄❄❄❄❄❄❄❄


🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा



⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳


समाप्त


➖➖➖➖


No comments:

Post a Comment