दिनविशेष २ जानेवारी
हा या वर्षातील दुसरा दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
२०००:संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.२०००:पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.१९९८:डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान१९८९:मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या१९५४:राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी ’भारतरत्न’ पुरस्कारांची स्थापना केली.१९४५:दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी न्यूरेम्बर्ग, जर्मनी येथे तुफानी बॉम्बवर्षाव केला.१९४२:दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.१९३६:मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना१९०५:मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला. आशियाई देशाने युरोपातील देशाचा केलेला पराभव ही त्या काळातील अतिशय महत्त्वाची घटना होती.१८८५:पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.१८८१:लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.१७५७:प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९६०:रमण लांबा – क्रिकेटपटू (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)१९५९:किर्ती आझाद – क्रिकेटपटू आणि खासदार१९३२:हरचंदसिंग लोंगोवाल – अकाली दलाचे अध्यक्ष (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)१९२०:आयझॅक असिमॉव्ह – अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक (मृत्यू: ६ एप्रिल१९९२)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
२००२:अनिल अग्रवाल – पर्यावरणवादी (जन्म: ? ? १९४७)१९९९:विमला फारुकी – भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)१९८९:सफदर हश्मी – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार (जन्म: १२ एप्रिल १९५४)१९४४:महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (जन्म: २३ एप्रिल १८७३)१९४३:हुतात्मा वीर भाई कोतवाल (जन्म: ? ? ????)१९३५:मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर – स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील (जन्म: १९ ऑगस्ट १८८६)१३१६:अल्लाउद्दीन खिलजी – दिल्लीचा सुलतान (जन्म: ? ? ????)
No comments:
Post a Comment