Saturday, January 5, 2019

जानेवारी

३ जानेवारी दिनविशेष

हा या वर्षातील तिसरा दिवस आहे.

जागतिक अ‍ॅक्युप्रेशर थेरपी दिन

मूलभूत कर्तव्यपालन दिन

महत्त्वाच्या घटना:

२००४:नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.१९५७:हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.१९५०:पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्‍घाटन झाले.१९४७:अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.१९२५:बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.१४९६:लिओनार्डो डा व्हिन्सीने उडणाऱ्या यंत्राची अयशस्वी चाचणी केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३१:य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक (मृत्यू: ११ जानेवारी २००८)१९२१:चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक (मृत्यू: ६ जुलै १९९७)१८८३:क्लेमंट अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: ८ आक्टोबर १९६७)१८३१:सावित्रीबाई फुले – समाजसेविका (मृत्यू: १० मार्च १८९७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२:सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (जन्म: २५ सप्टेंबर १९२०)२०००:डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे. (जन्म: २६ डिसेंबर १९१४)१९९८:प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (जन्म: ८ फेब्रुवारी १९०९)१९९४:अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक (जन्म:१९७५:बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन. त्यांच्या हत्येचे गूढ अजुनही उलगडलेले नाही. (जन्म: २ फेब्रुवारी १९२३)१९०३:अ‍ॅलॉइस हिटलर – अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील (जन्म: ७ जून १८३७)

No comments:

Post a Comment