Thursday, January 3, 2019

4/1/2019 शुक्रवारचा परीपाठ


परीपाठ
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
❂ दिनांक:~   
     4/1/2019 शुक्रवारचा परीपाठ
🔘 *वार :- शुक्रवार
📎➿➿➿➿➿📎
*संकलन* 
⛔⛔⛔⛔⛔⛔
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
*बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇 
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
🎯 पंचाग🎯
💹💹💹💹💹💹💹
➖➖➖➖➖➖
म्यानमारचा मुक्तीदिन.
आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन.
मार्गशीर्ष तिथी: कृ.चतुर्दशी ज्येष्ठा पक्ष: वृद्धि
सूर्योदय:  २७.५३ नं.सिंह सूर्यास्त: ७.१५
सवंत: विष्टि
१८.१२: भा. पौष १४
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
2] !!सुविचार !!
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
* कभी भी कोई सुन्दर चीज देखने का अवसर मत गँवाइये , क्योंकि सुंदरता ईश्वर की लिखावट है। 
राल्फ वाल्डो इमर्सन 
🌈 ❄❄❄❄❄🌈
3)आजची म्हण
📒📒🚬🚬🚬
आपलाच बोल आपलाच ढोल.
➖➖➖➖➖➖➖
‌(4) ❂ प्रार्थना❂
सर्वात्मका सर्वेश्वरा
गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा ॥
दित्य या तिमिरात व्हा
ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता
अनुदारिता दुरिता हरा ॥
➖➖➖➖➖➖➖
05 ]🔯सुभाषित🔯
➖➖➖➖➖➖➖
सत्यस्य वचनं श्रेय: सत्यादपि हितं वदेत् ।
यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं मतं मम ||
🏓🏓🏓🏓🏓🏓🏓🏓🏓🏓🏓
06] 🌀बोधकथा🌀
 ➖➖➖➖➖➖➖
राजा ज्ञानसेनच्‍या दरबारात दररोज शास्‍त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्‍त्रासंबंधी चर्चा करण्‍यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्‍त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्‍हणून घोषित केले जात असत त्‍यांना राजा धन आणि मान देऊन सन्‍मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्‍या दरबारात असाच शास्‍त्रार्थ चालला होता. त्‍या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्‍यात आले. राजाने त्‍याचा भरसभेत सत्‍कार केला व मान देण्‍यासाठी त्‍याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्‍याच्‍या विद्वत्तेच्‍या सन्‍मानार्थ राजा स्‍वत: त्‍याला चव-या ढाळत त्‍याला घरापर्यंत सोडण्‍यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्‍मानाने घरी आला हे पाहून भारवीच्‍या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्‍याबरोबर भारवीने मातेला साष्‍टांग नमस्‍कार केला पण पित्‍याला मात्र उपेक्षेने उभ्‍याउभ्‍याच नमस्‍कार केला. त्‍याच्‍या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्‍याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्‍मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्‍वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्‍याने त्‍याच्‍या त्‍याही नमस्‍काराचा स्‍वीकार केला आणि त्‍याला चिरंजीवी भव असे म्‍हटले. गोष्‍ट इथेच संपली असे नाही. मात्‍यापित्‍यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्‍या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्‍हते. याचे कारणही स्‍पष्‍ट होते की भारवीला यश पचविता आले नव्‍हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्‍या धुंदीत शिष्‍टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्‍याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्‍हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्‍यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्‍त्रार्थ करायला जाणार होतास त्‍याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्‍या काळात ते परमेश्‍वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्‍यांनी कितीतरी स्‍वत:च्‍या इच्‍छा दाबून ठेवल्‍या व तुला शास्‍त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्‍मत्त होऊन तू त्‍यांची उपेक्षा केलीस हेच आम्‍हा दोघांच्‍या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्‍याने मातापित्‍याच्‍या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्‍यात पुन्‍हा कधीही त्‍याने मातापित्‍यांची सेवा करण्‍यात कसूर केली नाही.
➖➖➖➖➖➖➖
‌ 7) 🍥बालगित🌞
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मला भूक लागली
शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली
धम्मक लाडू चापट पोळी
नको देउ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली
सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावर खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली

🎷🎷🎷🎷🎷🎷🎸🎸
8)दिनविशेष
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
        १४९३ : दर्यावर्दी कोलंबसाने जलपर्यटनास सुरुवात केली.
    १८८५ : केसरी वॄत्तपत्राची सुरुवात
    १९६४ : भारतातील पहिले डिझेल वाराणसी येथे तयार झाले.
    १९९६ : कावेरीचे पाणी तामिळनाडू राज्याला सोडले.
    १९५८ : स्पुतनिक १, पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला.
    २००४ : नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली.
    १९६२ : न्यूयॉर्कमध्ये चालकरहित रेल्वे सुरू झाली.
    १९०० : जेम्स बाँड, अमेरिकनपक्षीशास्त्रज्ञ.
    १९०९ : प्रभाकर पाध्ये, मराठी नवसाहित्यिक.
    १९१४ : इंदिरा संत, मराठी कवियत्री.
    १९२४ : विद्याधर गोखले नाटककार, खासदार, लेखक संपादक.
    १९३७ : सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
    १९४० : श्रीकांत सिनकर, मराठी कादंबरीकार.
    १६४३ : सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
----------------------------------
🌞🌞🌞🌞🌞🌞
‌9)🍭देशभक्ति गीत  🍭
===============
ऐ मातृभूमि तेरी जय हो, सदा विजय हो
प्रत्येक भक्त तेरा, सुख-शांति-कांतिमय हो
अज्ञान की निशा में, दुख से भरी दिशा में
संसार के हृदय में तेरी प्रभा उदय हो
तेरा प्रकोप सारे जग का महाप्रलय हो
तेरी प्रसन्नता ही आनंद का विषय हो
वह भक्ति दे कि 'बिस्मिल' सुख में तुझे न भूले
वह शक्ति दे कि दुख में कायर न यह हृदय हो
रामप्रसाद बिस्मिल
♦♦♦♦♦➡➡➡➡➡➡♦♦♦
10)🍃प्रेरणादायक विचार🍃
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
सौंदर्य शक्ति है; एक मुस्कान उसकी तलवार है। ⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌11❄बडबडगित❄ ⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
'गोरी गोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण

गोर्‍यागोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण !

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान !
➖➖➖➖➖➖
12🌈आजचे थोरव्यक्ती🌈
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तात्या टोपे (रामचंद्र पांडुरंग टोपे )
रामचंद्र पांडुरंग टोपे ऊर्फ तात्या टोपे (१८१४ - एप्रिल १८, १८५९) हे १८५७ च्या उठावामधील सेनानी होते.
जीवन
१८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवल्यातला त्यांचा जन्म. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले. पुढे बरीच वर्षे नानांच्या दरबारात तात्या कारकुनी कामांत गुंतलेले होते. १८५७ च्या समरात ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले.
१८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाची कमतरता, पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती, पण तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती.

नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास, ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईचा पराभव या पार्श्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता. शत्रूवर जरब बसवत, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.

तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्चय मात्र कायम होता. तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला थिटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले.

७ एप्रिल, १८५९ रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहेर्‍यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दु:ख तर नव्हतेच, होता तो देशाभिमान अन्‌ हौतात्म्याचे समाधान! १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. १८ एप्रिल, १८५९ रोजी त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आले. या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तसे तात्या टोपेंचे पुतळे मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी आहेत. भोपाळला तात्या टोपे नगर(टी.टी. नगर) नावाची पेठ आहे. तात्या टोपे स्टेडियम आहे, शेजारी टोपेंचा भव्य पुतळाही आहे.

महाराष्ट्राचे ऊर दु:खाने पण अभिमानानेही भरून आणणारी ही घटना तात्यांसारख्या मराठी वीराची ख्याती जगभर पसरवून गेली.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
13🌀आजचा अनमोल🌀 
⏩⏩ bvc➖➖➖➖
* बिना किताबों के कमरा बिना आत्मा के शरीर के समान है .
🎌🎌🎌🎌🎌🎌🎌
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌14)🌀 समुहगित 🌀
-------------------------
हा अखंड नंदादीप जळणार सतत जळणार
हा असाच तेवत जगती निज प्रकाश नित देणार॥धृ॥

जळत जळत जरि आत्मनाश हो जीवन सार्थकता ही
घोर निराशा शातमविनाश हो ध्येय अंतरी राही
हा प्रदीप्त नंदादीप अवनीस प्रकाशविणार॥१॥

चिरकाल जळत असणे इतरांसहि चेतविणे
हे कार्य सतत करणे दशदिशा प्रकाशविणे
आकांक्षा धरुनी चित्ती हा जळत जळत जळणार॥२॥

प्रलय वादळी नंदादीप मुळिं न थरथरे असे ज्वलंत
ज्वालामुखिपरि वरुनि शांत हा दया क्षमा ठेवी थोर
गंभीर मनी खंबीर प्रज्वलित राष्ट्र करणार॥३॥

एक दीप दुसऱ्यास चेतवी ऐसे अगणित होती
जागृत हा राष्ट्रास जागवी देउनि जीवनस्फुर्ती
हा एकच नंदादिप पण दीपमाळ करणार॥४॥
❄❄❄❄❄❄❄
15)🌈सामान्य ज्ञान🌈
🌎 *!! सर्वात मोठे सर्वात लहान सर्वात उंच !!*

▪ चिल्का सरोवर (ओरिसा) भारतातील सर्वात मोठे सरोवर होय.
▪ कळसूबाई सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रात असलेले सर्वात उंच शिखर होय.
▪ सिक्कीम भारतातील सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य होय.
▪ राजस्थान क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य होय.
▪ माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
▪ महानदीवरील हिराकूड हे सर्वात लांब धरण भारतातील ओडिसा राज्यात आहे.
▪ जोग हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
▪ 21 December हा भारतातील सर्वात लहान दिवस आहे .
▪ ग्रीनलँड क्षेत्रफळानुसार जगातील सर्वांत मोठे बेट आहे.
🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹🕹
१६) 🎯मुहावरे  🎯
उलटी गंगा बहाना
अर्थ
अनहोनी हो जाना
उदाहरण
राम किसी से प्रेम से बात कर ले ,तो उलटी गंगा बह जाए ।
➖ स➖मा➖प्त➖➖
🔽 बालचंद चौधरी
9545238102
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा 
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment