🌹परीपाठ*🌹
❂ दिनांक:~ 29/1/2019
🔘 *वार : मंगळवार-🔘
➿➿➿➿➿➿➿➿
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
🌅 * बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
🖕माझ्या blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1
9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
💥🇮🇳 *राष्ट्रगीत 🇮🇳💥*
💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*01 ] ❂ आजचे पंजाग 🔯
💲💲💲💲💲💲💲💲💲
शहीद दिन : भारत.
पौष तिथी: कृ.दशमी अनुराधा पक्ष: ध्रुव
सूर्योदय: १४.५९ नं.कर्क सूर्यास्त: ७.१५
सवंत: बव
१८.२८: भा. माघ १०
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*0२ ] सुविचार
💒💒💒💒💒💒💒💒
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
🈴🈴🈴🈴🈴📖📖📖( 3)म्हण वत्याचा अर्थ
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
पालथ्या घड्यावर पाणी –
★ अर्थ ::~ सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
➖➖➖➖➖➖➖
(4) ❂ प्रार्थना❂
➿➿➿➿➿➿➿➿
❂ तुम्ही हो माता ❂*
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना, सिवा तुम्हारे...
तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना, सिवा तुम्हारे...
तुम्ही हो नैया, तुम्ही खिवैया, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
जो खिल सके न, वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल हम हैं...
जो खिल सके न, वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल हम हैं...
दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो...
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो.
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
(5)बालगित
💒🌄🌄🌄🌅🎢🎢🎢
लाल टांगा घेऊनी आला, लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला
कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला
टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला
लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला
"चल रे लाला, ने रे मला, माझ्या गावाला"
लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला
झाडे लालेलाल त्यांची फुले लालेलाल
रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल
लालेलाल धुरळा उडवित गेला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला
➖➖➖➖➖➖➖➖➖
*06] 💠💠 सुभाषीत💠💠💠
====••◆◆●★●◆◆◆••====
. पक्षिणां बलमाकाशो मत्स्यानामुदकं बलम् |
दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् ||
➖➖➖➖➖➖➖
7) 🌺 दिनविशेष🌳
-------------------------------;;---;;;;;;---
१७८१ : भारतातील पहिले वृत्तपत्र ‘दि बेंगॉल गॅझेट’ याचा प्रारंभ.
१२७४ : संत ज्ञानेश्वर महाराजांचे श्रीगुरु निवृत्तीनाथ.
१८७१ : राजकवी चंद्रशेखर गोऱ्हे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
8)समुहगित
💠💠💠💠💠💠💠
आक्रमकांशी झुंझत झुंझत समरी विजयी होउ चला
आक्रमणा नच साहिल भारत गर्जुनि सांगू जगताला॥धृ॥
उन्नत शिखरे हिमालयाची
पवित्र श्रध्दास्थाने अमुची
प्राणपणाने रक्षायाची
हीच प्रतिज्ञा आता अमुची देइल आम्हा विजयाला॥१॥
दे जगदंबे तलवारीला
देइ शंकरा पाशुपताला
योगेश्वर द्या सुदर्शनाला
या अस्त्रांनी दानव मर्दुनि अखंड रक्षू सीमेला॥२॥
स्वातंत्र्याचे करण्या रक्षण
सामर्थ्याचे करु संवर्धन
हासत करुनी प्राणसमर्पण
उंच उभवु या भूमितलावर भारत - भू - अभिमानाला॥३॥
कोटिकोटि मनगटे उभारुन
आक्रमणा या काढू ठेचुन
कोटिकोटि कंठातुन गर्जुन
विजयश्रीने मंडित करु या सदैव भारतजननीला॥४॥
➖➖➖➖➖➖➖➖➖
(9) प्रेरणादायक विचार
🍀🍀🍀🍀🍀🍁🍁🍁🍁
सुख ही एक मानसिक
सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच
हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच
शकत नाहीत...
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल.
🏯🏯🏯🏯🏯🏯🏯🏯🏯
1 0 ] देशभक्ति गीत
🗑🗑🗑🗑🗑🗑🗑🗑🗑
लंदन देखा
पैरिस देखा
और देखा जापान
माईकल देखा, एल्विस देखा
सब देखा मेरी जान
सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान
दूसरा हिंदुस्तान
ये दुनिया एक दुल्हन
दुल्हन के माथे की बिंदिया
ये मेरा इंडिया
आई लव माई इंडिया
जब छेड़ा मल्हार किसी ने
झूमके सावन आया
आग लगा दी पानी में जब
दीपक राग सुनाया
सात सुरों का संगम ये जीवन गीतों की माला
हम अपने भगवान को भी कहते हैं बांसुरी वाला
ये मेरा इंडिया...
पीहू-पीहू बोले पपीहा, कोयल कूहू-कूहू गाये
हँसते, रोते, हमने जीवन के सब गीत बनाए
ये सारी दुनिया अपने-अपने गीतों को गाये
गीत वो गाओ जिससे इस मिटटी की खुश्बू आये
आई लव माई इंडिया...
वतन मेरा इंडिया
सजन मेरा इंडिया
करम मेरा इंडिया
धरम मेरा इंडिया
==================
11] थोरपुरुष माहिती
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
*❒ ♦निनाद बेडेकर ♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १७ ऑगस्ट १९४९ पुणे
●मृत्यु :~ १० मे २०१५शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक ★ निनाद बेडेकर ★
छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे अभ्यासक अशी ख्याती होती. निनाद बेडेकर यांनी मॉडर्न शाळेतील शिक्षणानंतर शासकीय तंत्रनिकेतन येथून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांच्या मातोश्री या सरदार रास्ते घराण्यातील होत्या. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी महिलांचे संघटन केले होते. हाच वारसा निनाद बेडेकर यांच्याकडे आला. शिवचरित्राची गोडी लागल्याने बेडेकर इतिहास संशोधनाकडे वळाले. इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी मोडी, फार्सी, उर्दू या लिपींवर प्रभुत्व मिळविले. या लिपीमध्ये असलेल्या हस्तलिखिते आणि कागदपत्रांचे वाचन करून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. त्याचबरोबरीने बेडेकर यांनी पर्शियन, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजी या परकीय भाषा आत्मसात केल्या. शिवचरित्र आणि १८ व्या शतकात देशभर विस्तारलेले मराठी साम्राज्य या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. राज्यातील आणि देशातील किल्ल्यांवर भ्रमंती करून शिवकालीन इतिहासामध्ये ते रममाण झाले होते. शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केले. शिवाजीमहाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी या पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यांनी लेखन केले होते. शिवरायांची व्यवस्थापकीय कौशल्ये हा विषय ते एमबीएच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये समजावून सांगत असत. लालित्यपूर्ण शैलीमध्ये ऐतिहासिक लेखन करणाऱ्या बेडेकर यांची ‘शिवभूषण’, ‘थोरलं राजं सांगून गेलं’, ‘गजकथा’, ‘हसरा इतिहास’, ‘दुर्गकथा’, ‘विजयदुर्गचे रहस्य’, ‘समरांगण’ आणि ‘झंझावात’ ही निनाद बेडेकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३५ पुस्तकांसह शेकडो लेख आणि शोधनिबंध लिहिले. गेल्याच महिन्यात त्यांचे ‘अजरामर उद्गार’ हे अखेरचे पुस्तक प्रकाशित झाले होते. इतिहास संशोधनाच्या कार्यामध्ये रममाण होण्यासाठी त्यांनी किर्लोस्कर कमिन्समधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री रायगड स्मारक मंडळ, श्री राजगड स्मारक मंडळ, गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ या संस्थांशी संबंधित असलेले बेडेकर हे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाचे आयोजन करणाऱ्या ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ संस्थेचे अध्यक्ष होते. निनाद बेडेकर यांना शिवभूषण, दुर्ग साहित्य पुरस्कार, जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, पुराण पुरुष पुरस्कार, शिवपुण्यतिथी रायगड पुरस्कार या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. शनिवारवाडा येथील ध्वनिप्रकाश योजनेमध्ये दाखविल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बेडेकर यांनी संहितालेखन केले होते. गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती झाली होती. छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीमध्ये निनाद बेडेकर यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या. निनाद बेडेकर यांचे १० मे २०१५ रोजी निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🎆🎆🎆🎍🎍🎆🎆🎆🎆
====••◆◆●★●◆◆◆••====
12 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
✿भुगोल सामान्य माहिती ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ *कांचनगंगा* हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर तर, k2(गॉडवीन ऑस्टीन 8611 मी. ) हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे..
■ दक्षिण भारतीय पठारास *दख्खनचे पठार* असे म्हणतात..
■ अंदमान समूहातील *बॅरन बेटावर* भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे..
■ *इंदिरा पॉंईट* हे भारताचे सर्वात शेवटचे टोक आहे.
📖📖📖📖📖📖📖
13) देशभक्ति व शायरी
⛲⛲⛲⛲⛲
इक्कीसवी सदी के देहलीज पे रखा है कदम,
दिल मे है कुछ सपने बस उसका हो कर
तो मंजील अपनी पाकर दिखाऐंगे हम,
नया जहाँ बसायेंगे हम,
क्योंकी हम भी नही कुछ कम
🎡🎡🎡🎡🎡🎡🎡
14)आजचे इंग्रजि शब्द
(1)chariot. ;- रथ
(२) chwish:- गाईसारखा भित्रा
(३) cyclist-: सायकलस्वार
🌻🌻🌾❄❄❄❄❄❄
मंगळवार
29/1/2019
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
समाप्त
➖➖➖➖
🖕माझ्या blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
http://balchandchaudhari.blogspot.com/?m=1
No comments:
Post a Comment