Monday, January 28, 2019

28/1/2029 जानेवारीचा परीपाठ

28/1/2019चा परीपाठ
🌹परीपाठ*🌹
❂ दिनांक:~     28/ 01/2019
  *वार :-  सोमवार----
➿➿➿➿➿➿➿
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
* बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
http://balchandchaudhari.blogspot.com/
9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
💥🇮🇳 *राष्ट्रगीत  🇮🇳💥*

*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*

💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥
⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩⏩
‌01 ]   ❂ आजचे पंजाग
🔛🔛🔛🔛🔛🔛🔛🔛🔛
    मंगळवार, मिती शके १९३७
पौष तिथी: कृ.अष्टमी स्वाती पक्ष: शूल गंड
सूर्योदय:  १४.५५ नं. मिथुन सूर्यास्त: ७.१६
सवंत: तैतिल
‌१८.२७: भा. माघ
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
‌0२ ]   सुविचार
💒💒💒💒💒💒💒
18. *एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही. 
📖📖📖📖
( 3)म्हण वत्याचा अर्थ
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर –
  ★ अर्थ ::~ दोनपैकी एक पर्याय निवडणे
🔶➖➖➖➖➖🔺
माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
http://balchandchaudhari.blogspot.com/
(४)❂ प्रार्थना❂
➿➿➿➿➿➿➿
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना
चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आता
➖➖➖➖➖➖➖
*05 ] 💠 सुभाषीत💠💠

  दुर्जनः परिहर्तव्यः*
    *विद्ययाऽलंकृतोऽपि सन्
  ⭐अर्थ :: ~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*06)♦दिनविशेष*♦
    २००० : इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणार्‍या ‘अनुवादक’ या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते प्रकाशन.
    २००३ : मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.
    १८६५ : लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयींतील.
    १९०० : के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल.
    १९२५ : डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.
    १९३० : पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
( 7)समुहगित*

भगवंताचे जया लाभले। चिर विजयी वरदान।
संघा वाचुन कोण स्विकारिल। काळाचे आव्हान॥धृ॥

परंपरचे पौरुषाचे।पराक्रमी पुरुषांचे।
पुनीत पावन घडते येथे।पुजन वसुंधरेचे।
मांगल्याचे पावित्र्याचे। राष्ट्रीय चारित्र्याचे।
संघशक्तिने चरित्र घडते। बाल-तरुण-प्रौढाचे।
इथेच मिळतो मायभूमिला। अग्रपुजेचा मान॥१॥

पुण्यपुरातन इथे सनातन।ध्वज भगवा आमुचा
ग्राम नगर गिरिकंदरि डोले। जगी दिग्विजयाचा।
विश्वगुरुपदी सदा नांदला।विजयी जगताचा।
नानक गुरुचा महाराणाचा। विक्रमी शिवबाचा।
नील अंबरी फडकत असता। चढे नवे अवसान॥२॥

काल्पनीक प्रांतांच्या सीमा।भेद इथे ते सरले।
जाति-पंथ-भाषेचे अंकुर।कधी न इथे रुजले।
भिन्नत्वातुन अभिन्नतेचे।विशाल मंदिर उठले।
अंजिक्य-अविचल मंदिरात या।केशवदर्शन घडले।
कोटि कोटि हृदयांत चिरंतन। कार्याचा अभिमान॥३॥
➖➖➖➖➖➖➖
08]बोधकथा*
❃. *❃ कोकिळा,पोपट व घार ❃*
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
*एका गरीब भोळ्या कोकीळाला* एका घारीचे मरणप्राय भय वाटले. कारण घार तिच्या डोक्यावर ओरडत व भक्ष्यासाठी घिरट्या घालत फिरत होती.
            ते पाहून एक पोपट कोकीळाला म्हणाला की, 'इकडे ये, घाबरू नको, धीर धर. हा सर्व किलकिलाट व धडपड केवळ मूर्खपणाची आहे. शेवटी या आळशी घारीने एखादा गरीब बेडूक किंवा उंदीर पकडलेला तू पाहशील, अरे ससाणे हे खरे भयंकर पक्षी असून ते काही गडबड न करता मुकाट्याने प्राणी पकडून खातात.'
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  बोलेल तो करेल काय ? गर्जेल तो पडेल काय
➖➖➖➖➖➖
9)* *बालगित*
➡➡➡➡➡➡➡➡
10 ]  देशभक्ति गीत
🗑🗑🗑🗑🗑🗑🗑
अमुचा भारत देश महान
   ●●●●००००००●●●●●
परदास्याची तुटे शृंखला सरला अंध:कार
नभी तिरंगी निशाण चढले करुया जयजयकार
स्वतंत्र झाली भारतमाता आम्ही तिचे संतान
अमुचा भारत देश महान !
स्वराज्य येथे सुराज्य व्हावे
रामराज्य या भूवर यावे
त्रिखंडात या अखंड राहो अजिंक्य हिदुस्थान
अमुचा भारत देश महान !
या देशाला शिकवून भक्ती
गांधिजींनी केली मुक्ती
राष्ट्रपित्याने दिले अम्हाला चिरंजीव वरदान
अमुचा भारत देश महान !
गरीब कोणी, अमीर कोणी
या मातीला समान दोन्ही
माणुसकीचे पाईक आम्ही, नाही थोर लहान
अमुचा भारत देश महान
=================
‌11] थोरपुरुष माहिती
*❒ ♦वसंतराव नाईक♦
➿➿➿➿➿➿➿➿➿
★महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री★
               व एक कृषितज्ञ.
_*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏●जन्म :~ १ जुलै १९१३
गहुली ता.पुसद जिल्हा यवतमाळ
*●मृत्यू :~ १८ ऑगस्ट १९७९*

       ◆वसंतराव फुलसिंग नाईक◆
    मानवता, न्याय व समतेसाठी झुंज देणारे जे महामानव झाले, त्यात वसंतराव नाईक यांचे अगक्रमाने आहे. हरितक्रांतीचे शिल्पकार महानायक महाराष्टाचे माझी मुख्यमंञी हरित क्रांतिचे प्रणेते, कुळ कायदयाचे जनक, महाराष्टृातील विज प्रकल्पाची निर्मिती करनारे, धरनाची निर्मिती करणारे, रोजगार हमी योजनेचे जनक, शेतकरी कारखानदार झाला पाहीजे असे स्वप्न पाहनारे, कापुस एकाधिकार योजनेचे जनक वंसतराव नाईक साहेब....
पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२–५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). पुढे १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी सु. १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.
प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य केले. १९७७ मार्चमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.

     समाज जागृतीचा पहिला अध्याय त्यांनी समाजाला दिला. त्यांचे हे विचार बंजारा समजापुरते मर्यादित न राहता प्रत्येक जाती, धर्म, विविध समाजात पोहचले आणि प्रत्येक ठिकाणी एक माणुस म्हणून पुढं यावे, हीच त्यांची इच्छा होती. दि. 18 ऑगस्ट 1979 रोजी वसंतराव नाईक व सौ. वत्सला नाईक या उभयंतांनी सिंगापूर यात्रा करत असताना वसंतराव नाईक यांचे 66 व्या वर्षी निधन झाले
🎆🎆🎆🎍🎍🎆
  14]  ❂ सामान्य ज्ञान ⚫
➖➖➖➖➖➖➖➖➖
✿ जिवनसत्व सर्व माहिती
   *जिवनसत्व ➜ ब1*
●शास्त्रीय नांव   ➜ थायमिन
●उपयोग  ➜ चेतासंस्थेचे आरोग्य
●अभावी होणारे आजार  ➜ बेरीबेरी
●स्त्रोत    ➜ धन्य, यीस्ट, यकृत,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

16)💠प्रेरणादायक विचार
जीवनात मागे बघाल तर,*
*अनुभव मिळेल..*
*जीवनात पुढे बघाल तर,*
       *आशा मिळेल..…*
*इकडे -तिकडे बघाल तर,*
       *सत्य मिळेल...*
*आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,*
        *आत्मविश्वास मिळेल...!
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
आजचा संदेश
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌀🎯 धरुनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची 🎯🌀
❄❄❄❄❄❄❄
🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
http://balchandchaudhari.blogspot.com/
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
समाप्त
➖➖➖➖

-

No comments:

Post a Comment