🌹परीपाठ*🌹
🌏🌎🌍🌏🌏🌏🌏🌏
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
*🌅 * बालचंद चौधरी* *वैजापुर* 9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
❂ दिनांक:~ 2 8 /11/2018
🔘 *वार :-बुधवार--------🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋
💥🇮🇳 *राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
समता दिन
महिना : कार्तिक, तिथी : कृ षष्ठी, नक्षत्र : पुष्य आश्लेषा
योग : ब्रह्मा, करण : गर
सूर्योदय: ६.५६ सूर्यास्त: १७.५७
━━━═•●◆❃★❂★❃◆●•═━
💢💢💢🖇🖇🖇
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] सुविचार ❂
मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेम रुपी पाण्याचे सिंचन लागते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0३] ❂ म्हण अर्थ❂
6. उंटावरचा शहाणा –
★ अर्थ ::~ मूर्ख सल्ला देणारा.
➖➖➖➖➖➖➖
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••==== . *सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ।*
⭐अर्थ ::~
सर्व जग सत्यावर आधारलेले आहे.➖➖➖➖➖➖➖
*0५ ] ♦दिनविशेष*♦
★★ 🔻====●●●★●●●====🔻
★ 28. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★समता दिन
★हा या वर्षातील ३३२ वा (लीप वर्षातील ३३३ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर
●१९६७ : जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी ’पल्सार’ तार्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
●१९६४ : नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.
●१८२१ : पनामाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८७२ : रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, भालचंद्र पेंढारकर, हरिभाऊ घांग्रेकर हे त्यांचे काही नामांकित विद्यार्थी होत.
◆१८५७ : अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा
◆१८५३ : हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : अनंत काणे – व्यावसायिक रंगभूमीवर दर्जेदार नाटकांच्या निर्मितीद्वारे आपला ठसा उमटवणारे निर्माते,
●१९९९ : हनुमानप्रसाद मिश्रा – १९८८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक
●१९६७ : पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक
●१९६३ : त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक
●१८९३ : सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी
●१८९० : जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विषेशत: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत (जन्म: ११ एप्रिल १८२७
🔻====●●●★●●●====🔻
==●●●★●●●====
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*६)समुहगित*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
अंतरी अपुल्या असावी एकतेची आस
एकता निर्मू अशी जी संपवी वनवास॥धृ॥
सर्व सुखी जन सर्वही त्राते
सर्व सारखे सर्वही भ्राते
दुःख खिन्नता भिन्नता नेइल जी विलयास॥१॥
परंपरेचा ध्वज संस्कृतिचा
केन्द्र मानुया सकल कृतीचा
पक्ष भेद वा मतमतांतरे ठरोत की आभास॥२॥
शक्तिशालिनी नव स्वतंत्रता
तशीच योजू निज कल्पकता
देश आपुला अखंड करु या लागो एकच ध्यास॥३॥
घराघरातुन राष्ट्रहितास्तव
निघोत सेवक वाढो वैभव
भावी भारत अभिमानाने स्मरेल तो इतिहास॥४॥
सामावुनिही घेइल जगता
अशी सुमंगल भारतियता
मांगल्याच्या विश्वशांतिच्या देइल संदेशास॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0७ ] ❂ देशभक्ती गीत ❂
🌇♉♏✡♈♈♈
20. *✸ जहाँ डाल डाल पर.. ●●●●●००००००●●●●●
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़ियाँ करती है बसेरा
वो भारत देश है मेरा।
जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा।
ये धरती वो जहाँ ॠषि मुनि जपते प्रभु नाम की माला
जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला
जहाँ सूरज सबसे पहले आ कर डाले अपना फेरा
वो भारत देश है मेरा।
अलबेलों की इस धरती के त्योहार भी हैं अलबेले
कहीं दीवाली की जगमग है कहीं हैं होली के मेले
जहाँ राग रंग और हँसी खुशी का चारों ओर है घेरा
वो भारत देश है मेरा।
जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवाले
जहाँ किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले
प्रेम की बंसी जहाँ बजाता है ये शाम सवेरा
वो भारत देश है मेरा।
━┅━═▣◆★✧★◆▣═▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ⚛ प्रार्थणा ⚛
====••◆◆●★●◆◆◆•
असो तुला देवा माझा
✶✶✹✹★●★✹✹✶✶
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरी प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनी आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३
●●●●●००००००●●●●●🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋
➖➖➖➖➖➖➖➖
0९]🔵बोधकथा*🔵🤝🤝🤝🤝 🍍🍍🍍🍍🍍🍍
*❃ शिक्षणाचा अंतिम
🎈🎈🎈🎈🎈🎈 एकदा आम्हा शिक्षकांचे असेच एक प्रशिक्षण होते. त्यात एक निवृत्त शिक्षक पण आले होते.
एकदा आम्हा शिक्षकांचे असेच एक प्रशिक्षण होते. त्यात एक निवृत्त शिक्षक पण आले होते.
आम्ही दिवसभर व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे? स्पेलिंग पाठ करावेत की नाही? कविता कशी शिकवायची? अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे? याचा काथ्याकूट करीत होतो.
संध्याकाळी ५ वाजले. सर्वांना जाण्याची घाई होती. आम्ही उठू लागताच ते निवृत्त शिक्षक बोलायला उठले आणि म्हणाले मी फक्त ३ मिनीटे बोलणार आहे. वैतागाने आम्ही सारे खाली बसलो. ते शिक्षक म्हणाले की, दिवसभर तुमची सर्व चर्चा मी ऐकली.
मी एक छोटे उदाहरण सांगतो ते जर तुम्ही नीट समजून घेतले तर तुम्ही चांगले शिक्षक व्हाल. आता आणखी काय उपदेश ऐकायचा अशा भावनेने आम्ही ऐकत होतो.
ते म्हणाले की, एका डोंगराच्या पोटाला एक झोपडी आहे. तिथे एक आदिवासी नवरा बायको राहतात. त्यांना एक ६ महिन्याचं मूल आहे. आजूबाजूला एक ही घर नाही. एकदा संध्याकाळी नवर्याला अचानक गावाला जावे लागले. पत्नी आणि मूल एकटेच आहेत. रात्री दोघे झोपले आणि अचानक मध्यरात्री ते मूल किंचाळून रडायला लागले.
ती आई काय करेल?
सांगा ना काय करेल?
ते आम्हाला विचारू लागले.
आम्ही सारे शांत झालो. कुणीच काही बोलेना...!!
ते शिक्षक पुन्हा आम्हाला विचारू लागले की, ती आई बालमानस शास्त्राची पुस्तके उघडून पाहिल का ? की मुलांना कसे हाताळावे याच्या वेबसाईट उघडून पाहिल? सांगा ना काय करेल यातल?
आम्हाला मुद्दा कळाला होता.
ते किंचित हसले आणि पुढे म्हणाले, ती यातले काहीच करणार नाही. ती तिला जे सुचेल ते करील. ती त्याला कडेवर घेईल. छातीशी कवटाळेल.. त्याच्यापुढे ताटली आणि चमचा वाजवेल त्याच्यापुढे नाचून दाखवील. गाणी म्हणेल. त्याला दूध पाजील. त्याला झोपडीबाहेर आणून चंद्र दाखविल. हे सारं सारं ती तिथपर्यंत करील की जोपर्यंत ते मूल शांत होत नाही.
ते पुढे म्हणाले की,
हे सारे ती का करील? हे तिला सारे का सुचेल?
कारण ते तिचे मूल आहे म्हणून.
त्या शिक्षकांनी क्षणभर सगळीकडे बघितले बोलताना क्षणभर थांबले आणि म्हणाले की त्या बाईसारखे तुमच्यासमोर बसलेले मूल तुम्हाला तुमचे वाटते आहे का? तितके प्रेम तुम्हाला जर त्याच्याबद्दल वाटणार असेल तर माझ्या मित्रांनो तुम्ही जे काही वर्गात कराल, तेच उपक्रम असतील, तीच अध्यापनाची पद्धती असेल. तुम्ही हातात जे काही घ्याल तेच शैक्षणिक साहित्य असेल आणि तुम्ही जो विचार कराल तेच शैक्षणिक तत्वज्ञान असेल.
यापलीकडे शिक्षण नावाचे काहीही नसते...!! आणि ते शिक्षक शांतपणे खाली बसले. आम्ही थक्क झालो. सुन्न झाले👍👍👍👍👍👍
•◆•◆•◆★◆•◆•◆•
१०)* *बालगित*
⛔⛔⛔💐💐
ये रे ये रे पावसा, रुसलास का ?
माझ्याशी गट्टी फू केलिस का ?
झर झर झर तू येणार कधी ?
अंगणात पाण्याची होईल नदी
ढगांच्या मागे असा लपलास का ?
गार गार वार्यांत नाचेन मी
खूप खूप पाण्यात भिजेन मी
विजेचि टाळि मला देतोस का ?
धुमधार पाण्यात रस्ता बुडेल
मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
गड गड गड आतां हसतोस का
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
११ ] 🔷प्रेरणादायी विचार🔷*
फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂🌇🌇🌇🌇🌇🌇🌇▂▂▂▂▂
*१२ ] देशभक्ति चारोळि
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
खूब बहती है, अमन की गंगा बहने दो…
मत फैलाओ देश में दंगा रहने दो…
लाल हरे रंग में ना बाटो हमको…
मेरे छत पर एक तिरंगा रहने दो
•◆◆●★●◆◆◆
➖➖➖➖➖➖✽≡✽≡≡✽≡✧❃✧≡✽≡≡▂▂▂▂▂▂▂▂
✽≡✽≡≡✽≡✧❃✧≡✽≡≡▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
१ ३ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
*संताजी घोरपडे*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
मराठी राज्यातील कठीण काळ म्हणजे औरंगजेब बादशहाने छत्रपती संभाजी राजांची निर्घृण हत्या केल्यानंतरचा काळ. या काळात औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेला शिवरायांच्या गनिमी काव्याच्या तंत्राने हैराण करणाऱ्या पराक्रमी सरदारामध्ये लखलखतं पान होतं ते सेनापती संताजी घोरपडे यांचं. संताजी घोरपडे यांनी मोगलांना आपल्या मोहिमांनी अशी काही जरब बसवली होती, की मराठी सैन्याविरुद्ध लढण्याची मानसिकताच या सैनिकांनी गमावली होती.
इतिहासात संताजी यांची नोंद जेवढा पराक्रमी आणि रणधुरंधर अशी आहे, त्याचबरोबर ते शीघ्रकोपी होते अशीपण आहे. राजकारण आणि त्याला लागणारा कावेबाजपणा या माणसाकडे नव्हता. त्याने कायम रणांगण आणि मोहिमा याचा विचार केला. शिवाजीमहाराजांच्या तालमीत तयार झालेल्या या सेनापतीला जहागीर आणि वतनासाठी भांडणे हे कधीच मान्य होण्यासारखे नव्हते; पण त्या वेळचा काळच असा कठीण होता, की राजाराम महाराजांना अशी वतने विविध सरदारांना द्यावी लागली. हे करत असताना कारभाऱ्यांनी आपला स्वार्थही साधून घेतला. सगळा काळच तेव्हा संक्रमणाचा आणि परीक्षा पाहणारा होता; पण या काळात संताजींचे मराठी राज्याशी असलेले इमान कधीही ढळले नाही. परिस्थितीशी कधीही त्यांनी तडजोड केली नाही. कायम आपल्या तत्त्वावर आणि तलवारीच्या बळावर त्यांनी आपला आब राखला. त्यांचा खून झाला, ही केवळ त्यांच्या कुटुंबासाठी दुर्दैवाची गोष्ट नव्हती तर ती अखिल मराठी राज्यासाठी दुर्दैवाची ठरली. धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्यात इतके टोकाचे मतभेद झाले नसते आणि ही दोन असामान्य माणसे एकत्र राहिली असती तर मराठी राज्याचा इतिहास वेगळा झाला असता आणि भूगोलही बदलला असता; पण तसे होणे नव्हते. जसे पहिल्या बाजीरावाला छत्रपती शाहू यांच्या काळातील कारभाऱ्यांनी छळण्याचा प्रयत्न केला, पण छत्रपतींच्या सतर्कतेने तो फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र, संताजी यांच्याबाबतीत तसे होऊ शकले नाही. एकतर कारभारी आणि त्याचे कारस्थान यशस्वी होत होते आणि शेवटी राजाराम महाराज आणि संताजी यांच्यातच इतके गैरसमज निर्माण झाले, की या दोघांमध्ये एकदा युद्धही झाले. राजांचीच गैरमर्जी झाल्यावर संताजींना काळ कठीण न येता तर नवलच. त्याचवेळी परिस्थितीही त्यांच्या बाजूने अनुकूल राहिली नाही. संताजींच्या आयुष्याची शोकांतिका व्हायला वेळ लागला नाही. पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या मराठी सेनानीची अखेर दुर्दैवी आणि करुण झाली.
─┅━━▣▣▣━━┅─┄🎗🎗🎗🎗🎗🎗🎗
१४) सामान्य ज्ञाण
🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋
*✿ कशास काय म्हणतात ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ पांढऱ्या हत्तीचा देश
➜ *थायलंड(सयाम)*
■ मँपल वृक्षाचा देश ➜ *कँनडा*
■ मध्यरात्रीचा सुर्य ➜ *नार्वे*
■ जगाचे साखरेचे कोठार
➜ *क्युबा*
■ पाचुंचे बेट
➜ *श्रीलंका,आर्यलँड
━┅━═▣◆★✧★◆▣═━
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑➖➖➖➖➖➖
🎆🎆🎆🎆🎆🎆🎇
१५) * 28 पाढा* * * *चा*
🎄🎄🎄🎄🎄🎄
28,56,84, 112,140,168,196,224,252,280
✴✴✴✴✴✴✴✴✴🌴✴
*विनम्र अभिवादन..!!*
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*संकलन*
*बालचंद चौधरी*
*प्रा*पदविधर*
*के*प्रा*शा*डवाळा*
*वैजापुर*
*.9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂🌺सहकार्य🌹
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 १)संजय गायकवाड वैजापुर. ISO मु अ
२) डोईफोडे सर बुलढाना
३) वाळुंज सर व आत्रम सर*
४) ता. कां. कदम
५) विलास शिरोले, ६). *vaibhav* *Cheke*
🙏🙏🙏🙏🙏🙏🌅🙏
*✧
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
◆ बुधवार 2 8/11/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ BVC VAIJAPUR ⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment