Friday, December 21, 2018

22/12/2018 चा शनिवार चा परीपाठ


परीपाठ
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
दिनांक:~  
     २२/१२/२०१८
🔘 *वार :-शनिवार
📎➿➿➿➿➿📎
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
*बालचंद चौधरी* वैजापुर
केंद्रीय प्रा शाळा डवाळा
9545238102,
8668466292
⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽
💥*राष्ट्रगीत💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 प्रतिज्ञा 💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
💥 संविधान💥
🖇🖇🖇🖇🖇🖇🖇
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
🎯 पंचाग🎯
💹💹💹💹💹💹💹
➖➖➖➖➖➖➖
राष्ट्रीय गणित दिन
सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ
उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस
महिना : मार्गशीर्ष, तिथी : शु.पौर्णिमा, नक्षत्र : मृग
योग : शुभ, करण : विष्टि
सूर्योदय: ७.१० सूर्यास्त: १८.०५
श्री दत्तात्रेय जयंती, कुलधर्म पौर्णिमा रा. ११.१८ पर्यंत
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌ 2] !!सुविचार !!
🎹🎹🎹🎹🎹🎹🎹
.फुटबॉल सारखेच आयुष्यात पण तुम्ही तोपर्यंत पुढे नाही जाऊ शकत जोपर्यंत तुमच्याकडे लक्ष्य नाही आहे.

- अरनॉल्ड ग्लासगो
🌈 ❄❄❄❄❄🌈
3)आजची म्हण
📒📒🚬🚬🚬📰📰

गोरा गोमटा आणि कपाळ करंटा.
➖➖➖➖➖➖➖
४) दिनविशेष
➿➿➿➿➿➿➿
१८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविण्यात आली.
१८८७ - श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती. ’पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले.
१६६६ - गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू
➖➖➖➖➖➖➖
‌(५) प्रार्थना❂
🔌🔌🔌🔌🔌
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा
शब्दरूप शक्‍ती दे
भावरूप भक्‍ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा
विद्याधन दे अम्हांस
एक छंद, एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा
हो‍ऊ आम्ही नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
कीर्तिचा कळस जाय उंच अंबरा
➖➖➖➖➖➖➖
0६ ]🔯सुभाषित🔯
भाग्यवान् जायतां पुत्रः मा शूरो मा च पण्डितः |
शूराश्च कृतविद्याश्च रणे सीदन्ति मत्सुताः ||➖➖➖➖➖➖➖
‌0७] 🌀बोधकथा🌀
 ➖➖➖➖➖➖➖
राजा भीमसेन याला आपल्‍या दौलतीबद्दल प्रचंड घमेंड होती. एके दिवशी त्‍याला त्‍याचा मित्र समशेर भेटण्‍यासाठी म्‍हणून आला. मित्राचे राजाने मनापासून स्‍वागत केले. त्‍याचा यथायोग्‍य पाहुणचार केला. विश्रांतीनंतर राजाने त्‍याला आपला महाल पाहण्‍यासाठी आमंत्रण दिले. दोघेहीजण महालातून फिरत असताना राजाने आपल्‍या श्रीमंतीचा थाट मित्राला दाखविण्‍यास सुरुवात केली. सर्वत्र त्‍याच्‍या श्रीमंतीचे कोंदण कसे आहे याबद्दल राजा मोठ्या गर्वाने सर्व माहिती देत होता. सर्व ठिकाणी फिरून झाल्‍यावर राजाने शेवट त्‍याला आपल्‍या खजिन्‍याच्‍या खोलीकडे नेले. राजाचा प्रचंड मोठा खजिना पाहून समशेरचे डोळे दिपून गेले. तो अचंबित होऊन खजिना पाहतच बसला. राजा खजिन्‍याबद्दल माहिती सांगतच होता की हा खजिना किती किंमती आहे. अनेक दुर्मिळ रत्‍ने, अलंकार, जडजवाहिर, मोती, सोने, चांदी, अनमोल अशा वस्‍तू कशा मी जमा केल्‍या आहेत. या खजिन्‍याच्‍या सुरक्षेसाठी काहीशे सैनिक चोवीस तास पहारा देत असतात. अशी सर्व माहिती राजा देत असतानाच समशेर ऐकत होता पण त्‍याचे राजाच्‍या बोलण्‍याकडे दुर्लक्ष होत होते. काही वेळाने समशेर शेवटी राजाला म्‍हणाला,’’मित्रा हे इतके धन तू जमा केलेले आहेस पण याचा दुस-यांनाही काही फायदा होतो की नाही’’ राजा म्‍हणाला,’’ अरे मित्रा, इतक्‍या बहुमूल्‍य अशा खजिन्‍याचा माझ्याशिवाय दुस-या कोणाला फायदा होणार आहे.’’ यानंतर समशेर राजाला बरोबर घेऊन एका झोपडीकडे गेला. तिथे एक वृद्ध महिला जात्‍यावर धान्‍य दळत बसली होती. समशेरने राजाला ते दळणाचे जाते दाखवून म्‍हणाला,’’ राजा हे जातेही दगडाचे आहे आणि तुझ्या खजिन्‍यात तू जी रत्‍ने ठेवली आहेत ती पण दगडाचीच आहेत. फरक इतकाच आहे की त्‍या रत्‍नांचा तुझ्याशिवाय कुणालाच फायदा नाही आणि या दगडाच्‍या जात्‍याचा मात्र सगळ्या गावाला फायदा होतो. गावकरी मंडळी येथे येतात व धान्‍य दळून घेऊन जातात. तू ज्‍यांना रत्‍नांच्‍या पहा-याला सैनिक उभे केले आहेत त्‍यांच्‍या अंगी शक्ती येते ती सुद्धा या जात्‍यातून निघणा-या पीठामधून. म्‍हणून राजन मला तुझ्या सर्व खजिन्‍यापेक्षा, राज्‍यातील सर्व श्रीमंतीपेक्षा ही दगडाची जाती मला सर्वश्रेष्‍ठ वाटली.’’  राजाला आपली चूक कळाली व त्‍याची घमेंड पूर्ण उतरून गेली.
➖➖➖➖➖➖➖
‌ (८) 🍥बालगित🌞
🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
किलबिल किलबिल पक्षि बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती,
पानोपानी फुलें बहरती, फूलपाखरे वर भिरभिरती,
स्वप्‍नीं आले काही, एक मी गाव पाहिला बाई !
त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे, कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे
सारे हसती, गाति नाचती, कोणी रडके नाही

नाही पुस्तक, नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो, पडो, धडपडो, लागत कोणा नाही

तिथल्या वेली गाणी गाती, पर्‍या हासर्‍या येती जाती
झाडांवरती चेंडु लटकती, शेतांमधुनी बॅटी
म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही
----------------------------------
🌞🌞🌞🌞🌞🌞
‌९)🍭देशभक्ति गीत  🍭
===============
  आज़ादी की अर्द्धशती
मत सोना पहरेदार।
खुले हैं आँगन, देहरी, द्वार।।

बीते वर्ष पचास, आस अब तक न हो सकी पूरी
जन-जन के अंतर्मन की अभिलाषा रही अधूरी
बदल गया माली
लेकिन है ज्यों की त्यों अनुहार।
खुले हैं आँगन, देहरी, द्वार।।
जिस मंज़िल के हित हम सब ने बाँधे थे मंसूबे
भटकी मंज़िल थके बटोही सपने हुए अजूबे
जमती गईं परत पर परतें
परतें अपरंपार।
खुले हैं आँगन, देहरी, द्वार।।
भाषा की जिस कश्ती पर हम समर लाद कर लाए
तट के पास कहीं उस तरणी को ही हम खो आए
अभी समय है शेष
उठा लो हाथों में पतवार।
खुले हैं आँगन, देहरी, द्वार।।
जोश-जोश में होश नहीं खो देना मेरे भाई
पाँव ज़मीं पर रहें अन्यथा होगी जगत हँसाई
खुशी-खुशी में गँवा न देना
जीने का अधिकार।
खुले हैं आँगन, देहरी, द्वार।।

डॉ. जगदीश व्योम
१३ अगस्त २०१२
➡➡➡➡➡➡➡➡➡
(१०)🍃आजचा   पाढा🍃
🌈🌈🌈🌈🌈🌈
२२,४४,६६,८८,११०,१३२,१५४,१७६,१९८,२२०
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌(११)❄बडबडगित❄
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
१२)📯थोरव्यक्ती🌈
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त(नरेंद्र, नरेन ) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


1३)🌀आजचा अनमोल विचार🌀
⏩⏩ bvc➖➖➖➖
"विचार" हे आपले सर्वात महत्वाचे भांडवल असले पाहिजे, मग जीवनात आपण किती चढ - उताराला सामोरे जातोय याचाशी काही संबंध नसतो.

- अब्दुल कलाम
🎌🎌🎌🎌🎌🎌🎌
⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅⬅
‌१४)🌀 समुहगित 🌀
-------------------------
भगवंताचे जया लाभले। चिर विजयी वरदान।
संघा वाचुन कोण स्विकारिल। काळाचे आव्हान॥धृ॥
परंपरचे पौरुषाचे।पराक्रमी पुरुषांचे।
पुनीत पावन घडते येथे।पुजन वसुंधरेचे।
मांगल्याचे पावित्र्याचे। राष्ट्रीय चारित्र्याचे।
संघशक्तिने चरित्र घडते। बाल-तरुण-प्रौढाचे।
इथेच मिळतो मायभूमिला। अग्रपुजेचा मान॥१॥
पुण्यपुरातन इथे सनातन।ध्वज भगवा आमुचा
ग्राम नगर गिरिकंदरि डोले। जगी दिग्विजयाचा।
विश्वगुरुपदी सदा नांदला।विजयी जगताचा।
नानक गुरुचा महाराणाचा। विक्रमी शिवबाचा।
नील अंबरी फडकत असता। चढे नवे अवसान॥२॥
काल्पनीक प्रांतांच्या सीमा।भेद इथे ते सरले।
जाति-पंथ-भाषेचे अंकुर।कधी न इथे रुजले।
भिन्नत्वातुन अभिन्नतेचे।विशाल मंदिर उठले।
अंजिक्य-अविचल मंदिरात या।केशवदर्शन घडले।
कोटि कोटि हृद❄❄❄❄
१५)🌈सामान्य ज्ञान
🔹 *!! १९ डिसेंबर – घटना !!* 🔹
☎☎☎☎☎☎☎
*🔹 गोवा मुक्ती दिन 🔹*
🖨🖨🖨🖨🖨🖨🖨
▪ १९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.

▪ १९४१: दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.

▪ १९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.

▪ १९६३: झांजिबारला युनायटेड किंगडमकडून स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.

▪ १९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.

▪ २००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
💿💿💿💿💿💿
१६)आजच्या बातम्या
🎻🎷🎷🎷🎷🎷🎸
📘📘📘📘📗📙📙
👩‍🏫 संयुक्‍त राष्ट्र संघाच्या प्रमुखांसमोर इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा मांडला
👩‍🏫 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रंप यांच्याबरोबर मतभेद झाल्याने संरक्षण मंत्री जेम्‍स मॅटीस यांचा राजीनामा
👩‍🏫 लोकसभेचं कामकाज २७ डिसेंबरपर्यंत स्‍थगित
👩‍🏫 मुंबई-गोवा महामार्गावर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी
👩‍🏫 मुंबईतील बेस्ट'चे कर्मचारी 8 जानेवारीपासून संपावर
👩‍🏫 भीमा कोरेगावप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांची याचिका न्यायालयाने फेटाळली
👩‍🏫 एअरटेलचा १६९ रुपयांचा प्लॅन लाँच
🌎 'इन्फो की' शिवाय व्हाट्सअप म्हणजे अभासी दुनिया...*
स➖मा➖प्त➖➖🔽 बालचंद चौधरी
9545238102
http://cpsdawala.blogspot.com/?m=1
🖕माझ्या  blog ला भेट द्या व दररोजचा परीपाठ मिळवा
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment