🌏 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐
🌹परीपाठ*🌹
❂ दिनांक:~ 30 /11/2018
🔘 *वार :- शुक्रवार--------🔘*
*संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
*🌅 * बालचंद चौधरी* *वैजापुर* 9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
सौजन्य - नितीन केवटे, समूह प्रमुख
भालचंद्र भोळे, मुख्य प्रशासक
..•●◆●★TSS★●◆●•═━━
अधिक अपडेट साठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या
http://tssmaha.blogspot.com/?m=1
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*💥🇮🇳 *राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻
लोकशिक्षण दिन (भारत)
एड्स प्रतिबंधक दिन
महिना : कार्तिक, तिथी : कृ.नवमी, नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी
योग : विष्कंभ प्रीति, करण : वणिज
सूर्योदय: ६.५७ सूर्यास्त: १७.५८
━━━═•●◆❃★❂★❃◆●•═━
💢💢💢🖇🖇🖇
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] सुविचार ❂
फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0३] ❂ म्हण अर्थ❂❂
*⃣*⃣*⃣*⃣*⃣*⃣*⃣*⃣*⃣
तोंड दाबून बुक्क्यांचा मार –
★ अर्थ ::~ विनाकारण जुलूम सहन करावा लागणे.
➖➖➖➖➖➖➖
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••==== .सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः |
तत्र सौरभनिर्माणे चतुरश्चतुराननः ||
➖➖➖➖➖➖➖
*0५ ] ♦दिनविशेष*♦
★★ 🔻====●●●★●●●==
30. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३३४ वा (लीप वर्षातील ३३५ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴 ●२००० : पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ’एन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
●१९९६ : ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ’महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान. हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे.
●१९१७ : कलकत्ता येथे ’आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युट’ची स्थापना
●१८७२ : हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔵🔵🔵🔵🔵🔵
◆१९६७ : राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता
◆१८७४ : विन्स्टन चर्चिल – दुसर्या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते
◆१८५८ : जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन
◆१८३५ : मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार
◆१७६१ : स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
💠💠💠💠💠💠💠 ●२०१२ : इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (जन्म: ४ डिसेंबर १९१९)
●२०१० : राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता
●१९९५ : वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक
●१९०० : ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार
🔻====●●●★●●●====🔻
==●●●★●●●====
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*६)समुहगित*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो॥
हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥
वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन
हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥
हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥
करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं
विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥
या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥
ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल
जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫
*0७ ] ❂ देशभक्ती गीत ❂
*✸ उठा राष्ट्रवीर हो ✸*
🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳🔳
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला, उठा राष्ट्रवीर हो
युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुन सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला....
वायुपुत्र होऊनी धरू मुठीत भास्करा
होऊनी अगस्तीही पिऊन टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला....
चंद्रगुप्त वीर तो फिरुन आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसांत साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला....
यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला....
●●●●●००००००●●●●●🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋
➖➖➖➖➖➖➖➖
0९]🔵बोधकथा*🔵🤝🤝🤝🤝 🍍🍍🍍🍍🍍🍍
💢 *फसवे बाह्यरूप* 💢
⚫⚫⚫⚫⚫⚫
*🔷एका रानातल्या* खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.
आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्यासारख्या उड्या मारणार्या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला.
त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'
🌀तात्पर्य_ ::~*
🔲🔲🔲🔲🔴🔴🔴🔴🔴
*बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.
◆•◆•◆★◆•◆•◆•
१०)* *बालगित*
⛔⛔⛔💐💐
शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मला भूक लागली
शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली
धम्मक लाडू चापट पोळी
नको देउ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली
सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावर खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂🌇🌇🌇▂▂▂▂▂
*१२ ] देशभक्ति चारोळि
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
===========================
झेलली छातीवर गोळी त्या विरांसाठी ,
दिला पोटचा गोळा त्या मातेसाठी,
पुसला कुंकवाचा टिळा त्या सौभाग्यासाठी,
निखळले डोईचे छत्र त्या पुत्रासाठी ,
कोटी-कोटी प्रणाम रक्त सांडलेल्या प्रत्येक जवानांसाठी।
➖➖➖➖➖➖✽≡✽≡≡✽
✽≡✽≡≡✽≡✧❃✧≡✽≡≡▂▂
(१ ३ ] थोरपुरुष माहिती
━━═•●◆●★●◆●•═━━
वासुदेव चाफेकर
🌐🌐🌐🌐🌐🌐🌐
●जन्म :~ २५ जून १८६९
●स्मृतिदिन :~ १८ एप्रिल १८९८
वासुदेव चापेकर व त्यांचे बंधू हे आद्य भारतीय क्रांतिकारकांमध्ये गणले जातात.
वासुदेव चापेकरांचा जन्म कोकणात एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चापेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला.
वासुदेव चापेकर यांनी दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले.
इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. ऑक्टोबरमध्ये मुंबईत गाठीच्या प्लेगची साथ पसरली ही साथ पुण्यापर्यंत पोहोचली. पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला.
रँडच्या प्रशासनाने या बाबतीत अक्षम्य अतिरेक केला. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनापण केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले. टिळक निर्जंतुकीकरण व सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रँडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता,
रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर जवळून गोळ्या झाडल्या. रँड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.
चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू शहीद झाले.
◆ आधारित चित्रपट ◆
चापेकर बंधूंवर आणि रँडच्या खुनाच्या घटनेवर '२२ जून १८९७' हा मराठी चित्रपट निघाला
─┅━━▣▣▣━━┅─┄🎗🎗
🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋🌋
१४)✿ सामान्य माहिती ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
1⃣ आहारातिल कर्बोदकाचा प्रमुख स्ञोत कोणता आहे ? ➜ *तृनधान्य*
2⃣ ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती व जास्तीत जास्त किती सभासद असतात ? ➜ *७ ते १७*
3⃣ माणसाच्या डोळ्यातिल आश्रुमधे कोणता घटक असतो ?
➜ *सोडियम क्लोराईड*
4⃣ केरळ मधिल पेरियार अभयअरण्य कोणत्या प्राण्यासाठी आहे ?
➜ *हत्ती*
9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣ 8⃣6⃣6⃣8⃣4⃣6⃣6⃣2⃣9⃣2⃣▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
15)
30 चा पाढा
30,60,90,120,150,180,210,
240,270,300
🙏🙏🙏🙏🙏🙏🌅🙏
16)
इग्रजी शब्द
१) school :- शाळा
२)engler:- गळाने मासे पकडणारा
३) Taluka :-तालुका
४) pashto पिश्तो
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║
◆ बुधवार ३०/11/2018 ◆*
🌐 *तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र*🌐
🌀🎯 धरुनी कास तंत्रज्ञानाची प्रगती होईल महाराष्ट्राची 🎯🌀
No comments:
Post a Comment