बोघकथा
➖➖➖➖➖
महिषासुरमर्दिनी दुर्गादेवी
➖➖➖➖➖➖➖
फार पूर्वी महिषासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांचा अतिशय छळ करत असे. एकदा त्याने प्रत्यक्ष इंइंफ
तिन्ही देवांनी एकत्र येऊन आपापल्या शक्तीने मिळून एक देवी निर्माण केली. शंकराच्या तेजाने देवीचे मुख, विष्णूच्या तेजाने हात आणि अग्नीच्या तेजाने तीन डोळे निर्माण झाले. अशा प्रकारे प्रत्येक देवाने देवीचा एकेक अवयव सिद्ध केला आणि त्यातून साक्षात् दुर्गादेवीची निर्मिती झाली. शिवाने आपला त्रिशूळ, विष्णूने चक्र, इंद्राने वज्र, अशी विविध आयुधे सर्व देवांनी तिला बहाल केली.
देवांच्या तेजापासून निर्माण झालेल्या या सर्वशक्तीमान दुर्गादेवीने महिषासुराला मारण्यासाठी रौद्र रूप धारण केले. महिषासुर आणि दुर्गा यांच्यात नऊ दिवस घनघोर युद्ध झाले. दुर्गादेवीने आपल्या त्रिशूळाने महिषासुराचा वध केला. महिषासुराचा वध केल्यामुळे दुर्गादेवीला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले. या प्रसंगाची आठवण म्हणून आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतो.
No comments:
Post a Comment