चंदाराणी चंदाराणी का ग,
चंदाराणी, चंदाराणी, का ग दिसतेस थकल्यावाणी
शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा
रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी ?
वारा, वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय टाकिशी
काठी देखिल नसते हाती, थोडी नाही विश्रांति
चढसि कैसी, कशी उतरसी, निळ्या डोंगरी अखंड फिरशी
वाडा, घरकुल, घरटे नाही, आई नाही, अंगाई
म्हणुनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी
चंदाराणी, चंदाराणी, का ग दिसतेस थकल्यावाणी
रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी ?
कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय टाकिशी
चढसि कैसी, कशी उतरसी, निळ्या डोंगरी अखंड फिरशी
म्हणुनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी
No comments:
Post a Comment