*Dcps ग्रस्त कै. नारायण पवार सरांच्या कुटुंबीयांना वैजापुरातील शिक्षकांकडून 5⃣ लाखांची मदत,तसेच दिवाळीची साडी भेट*
*सांत्वनाला वास्तविकतेचे भान,सांत्वनासोबत मदतीची जोड*
दि.7 नोव्हेंबर 2018 वार बुधवार
जि प प्रा शा पाराळा केंद्र लोणी येथील कार्यरत शिक्षक नारायण पवार यांचे निधन शिक्षकांच्या मनाला चटका लावून गेले.सन 2001 ला शासनाच्या वस्तीशाळा योजेनद्वारे दगडदेव वस्ती, पानगव्हान या स्वतःच्या गावी वस्तीशाळा शिक्षक म्हणून रुजू झाले.ते हि अवघ्या 1000 रुपये महिना इतक्या तुटपुंज्या मानधनावर.पण 2008-09 साली पटसंख्येअभावी शासनाने हि शाळा बंद करून त्यांना इतर शाळेंमध्ये सामावून घेतले.घरापासून 50 किलोमीटर लांबचा दररोजचा प्रवास करत त्यांचे हे ज्ञानदानाचे काम चालू होते.ते हि अवघ्या 1500 रुपये प्रति महिना या मानधनावर.पण 2104 साली शासनाच्या निर्णयामुळे ते पूर्ण वेळ शिक्षक म्हणून पूर्ण पगारावर काम करू लागले.घरची अतिशय बिकट परिस्थिती बदलण्यास संधीच भेटली.पण काळाला मात्र हे मान्य नव्हते की काय?त्यांचे या काळात डोके दुखू लागले.त्यावर शस्त्रक्रियाही केली.मात्र 21 सप्टेंबर रोजी त्यांचे यातच निधन झाले. घरी एकदिड एकर शेती ती ही कोरडवाहू. शासनाची जुनी पेन्शन तसेच इतर लाभ बंद झाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले.या कुटुंबाला आधार देण्यासाठी वैजापुरातील सर्व जि.प.ची शिक्षक मंडळी पुढे आली.आणि *स्वेच्छेने 5 लाखांची मदत* गोळा झाली.हि मदत fd च्या स्वरूपात पवार कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आली.तसेच भाऊबीजेनिमित्त साडी भेट देण्यात आली.
*महाराष्ट्रातील वैजापूर असा एकमेव तालुका आहे जो dcps ग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी एवढी मोठी रक्कम फक्त तालुक्यातील शिक्षकांकडूनच दिली जाते.*
यासाठी वैजापुरातील सर्व शिक्षक संघटना एकजुटीने पुढाकार घेतात.यात शिक्षक संघ,शिक्षक भारती, आदर्श शिक्षक समिती,शिक्षक समिती,शिक्षक सेना,मुप्टा, व महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटन या समन्वय समितीच्या माध्यमातुन हे काम करतात.या पूर्वी शहिद किरण थोरात यांच्या कुटुंबियांना हि 2 लाखांची मदत समन्वय समिती तर्फे करण्यात आली होती.अशा पद्धतीने तालुक्यातील शिक्षक ज्ञानदानाबरोबरच सामाजिक जबाबदाऱ्या देखील भक्कमपणे पार पाडत आहे.
✊✊✊✊✊✊✊✊✊✊

No comments:
Post a Comment